भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. भारताचा एक यशस्वी व चाणाक्ष कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वगुणाचे अनेक दाखले दिले जातात. खेळाडूच्या गुणांची अचूक जाण धोनीला असते आणि ते ओळखून त्यानं खेळलेले डावपेच अधिच अपयशी ठरलेले नाही. रोहित शर्माच्या बाबतितही त्यानं असंच एक भाकित केलं होतं आणि ते खरही ठरलं... रोहितनं त्या दिवशी जी खेळी केली, तिनं अनेक विक्रम मोडले.
हिटमॅन रोहित शर्मानं आंततराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पाच वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी 264 धावांची भीमपराक्रमी खेळी केली होती. 173 चेंडूंत त्यानं 33 चौकार व 9 षटकार खेचले होते. विशेष म्हणजे धोनीनं या खेळीपूर्वीच एक भाकित केलं होतं आणि रोहितनं ते तंतोतंत खरं ठरवलं. धोनीनं ट्विट केलं होतं की,''जर भारताचा हा सलामनीवीर लवकर बाद झाला नाही, तर तो 250+ धावा कुटेल आणि तशी खेळी तो करू शकतो.''