- सचिन कोरडे
पणजी : यंदाच्या विश्वचषकातील बऱ्याच गोष्टी स्मरणात राहण्यासारख्या आहेत. त्यात खराब पंचगिरीचाही समावेश आहे. अनेक सामन्यांत पंचांनीच फलंदाजांना ‘बाद’ केल्याचे दिसून आले. या विश्वचषकातील खराब पंचगिरीसुद्धा चाहत्यांच्या आठवणीत राहील. इंग्लंड-न्यूझीलंड अंतिम सामन्यातही पंचांकडून काही चुका झाल्या.
दरम्यान, असाच अनुभव उपांत्य फेरीच्या सामन्यातही आला. इंग्लंडच्या जेसन रॉयला पंचांनी बाद दिले. धर्मसेना यांनीच त्याचा ‘बळी’ घेतला होता. अंतिम सामन्यापूर्वी धर्मसेना-जेसन बातचित करताना दिसले. धर्मसेना हे जेसनची माफी मागत आहेत की काय, असेच वाटत होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीही खराब पंचगिरीचा बळी ठरला. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत विराट कोहलीचा बळी पंचांनीच घेतला. यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगली.
>पहिली घटना
सामन्याच्या तिसºयाच षटकात, न्यूझीलंड फलंदाजी करत असताना पंचांकडून चूक झाली. वोक्सने तिसºया चेंडूवर निकोल्सविरुद्ध पायचितचे अपील केले. चेंडू डाव्या बाजूने स्टम्पच्या वर दिसत असतानाही पंच धर्मसेना यांनी काही क्षणात बाद असल्याचा निर्णय दिला यावर निकोलसने रिव्हू घेतला. रिव्हूमध्ये तो नाबाद ठरला.
>दुसरी घटना
स्टाइकवर होता न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन. २३ वे षटक चालू होते. तेव्हा प्लंकेटने टाकलेला चौथा चेंडू बॅटला ‘टच’ करून बटलरच्या हाती विसावला. प्लंकेटने जोराने अपील केले; मात्र पंच धर्मसेना यांनी त्याला नाबाद दिले. यावर इंग्लंडने रिव्हू घेतला. तेव्हा ‘अल्ट्राएज’मध्ये चेंडू बॅटला लागून गेल्याचे स्पष्ट झाले. धर्मसेना यांनी निर्णय बदलला.
>तिसरी घटना
३४ व्या षटकांत रॉस टेलर वूडच्या गोलंदाजीचा सामना करत होता. चेंडू सरळ पायावर आदळल्याने वूडने जोरात अपील केले. यावर पंचांनी टेलरला बाद घोषित केले. रिप्लेमध्ये टेलर नाबाद दिसत होता. चेंडू स्टम्पच्या वरून गेला होता.
Web Title: When the punches are made, the bad punching experience in the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.