IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्धच्या सामन्यात अविश्वसनीय खेळी करून राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) रातोरात स्टार बनला. त्यानं शेल्डन कोट्रेलनं टाकलेल्या 18 व्या षटकांत पाच खणखणीत षटकार खेचून सामना RRच्या बाजूनं झुकवला. सुरूवातीला राहुलला चौथ्या स्थानावर पाठवल्यानं नेटिझन्स त्याला ट्रोल करत होते, परंतु त्या एका षटकातील फटकेबाजीनं त्याच नेटिझन्सही त्याला डोक्यावर घेतले. राहुलनं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीनं संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) च्या 85 धावांच्या खेळीलाही पडद्याआड केलं.
संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी
संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल
राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video
KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला.
राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!
रिकी पाँटिंगनं केली होती राहुलची थट्टा!टेवाटियानं गतवर्षी दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) प्रतिनिधित्व केले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर DCने यजमान मुंबई इंडियन्सवर ( Mumbai Indians) विजय मिळवला होता. तेव्हा विजयानंतर प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंचे कौतुक केले. त्या सामन्यात रिषभ पंतनं 27 चेंडूंत 78 धावा केल्या होत्या, कॉलिन इग्रामनेही 32 चेंडूंत 47 आणि शिखर धवनने 43 धावा केल्या होत्या. इशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट आणि कागिसो रबाडा यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली होती. त्या सामन्यात अक्षर पटेलच्या 3 षटकांत 42 धावा आल्या होत्या, परंतु खेळपट्टीच फिरकीपटूंच्या विरोधात असल्यानं त्याची पर्वा नसल्याचे पाँटिंग म्हणाला.
एवढं बोलून पाँटिंग जात होता, तेव्हा राहुल टेवाटियानं त्याला अडवलं. त्यांच्यातील संवाद नीट ऐकू येत नाही, परंतु त्यानंतर पाँटिंगनं टेवाटियाच्या चार कॅचचे कौतुक केलं आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, अशी त्याची इच्छा आहे.'' त्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये उपस्थित सर्वच हसू लागले. पाँटिंग निघून गेल्यानंतर अक्षर पटेल लगेचच टेवाटियाकडे गेला आणि ओळख मिळवण्यासाठी असं कोण हात पसरतं का?असा सवाल केला. त्यावर टेवाटिया म्हणाला, हक्कासाठी स्वतःला लढावचं लागतं.''
पाहा व्हिडीओ...
2014 मध्ये त्याच्या IPL मधील कारकिर्दीला सुरुवात रॉयल्सकडूनच झाली. पण, त्याला केवळ तीनच सामने खेळण्याची संधी मिळाली. 2017मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्यांनीही त्याला तीन सामने खेळण्याची संधी दिली. 2018मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 8 सामने खेळवले आणि 2019मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले.