Join us  

...जेव्हा सरफराज खानला मारण्यासाठी रॉबिन उथप्पा ड्रेसिंग रुममध्ये घुसला होता

एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा खेळाडू सरफराज खान मैदानावर ड्रिंक्स घेऊन आला होता. यावेळी कशावरुन रॉबिन उथप्पा आणि सरफराज खान यांच्यात बिनसलं आणि शाब्दिक चकमक उडाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 11:59 AM

Open in App
ठळक मुद्दे2015 मध्ये एका सामन्यादरम्यान सरफराज खान आणि रॉबिन उथप्पा यांच्यात बिनसलं होतंहा वाद सामना संपल्यानंतरही सुरु होताउथप्पाने सरफराजवर हातही उचलला होता, पण  एबी डिव्हिलिअर्स आणि अशोक डिंडाने त्याला अडवलं

मुंबई - गेल्या अनेक काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला रॉबिन उथप्पा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपुर्वी त्याने आपल्या मुलासोबतचा एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजीने अनेकदा उथप्पाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पण रॉबिन उथप्पाचं नाव आयपीएलमधील काही वादांसोबतही जोडलं गेलं आहे.  गतवर्षी आयपीएलदरम्यान एका सामन्यात रॉबिन उथप्पाने हैदराबादचा गोलंदाज सिद्धार्थ कौलला खांदा मारला होता. पण त्याआधी 2015 मध्ये उथप्पाने असं काही केलं होतं, जे तो कदाचित कधीच विसरणार नाही. 

2015 मध्ये एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा खेळाडू सरफराज खान मैदानावर ड्रिंक्स घेऊन आला होता. यावेळी कशावरुन रॉबिन उथप्पा आणि सरफराज खान यांच्यात बिनसलं आणि शाब्दिक चकमक उडाली. या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली होती. 

या सामन्यात आरसीबी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचली होती. त्याचवेळी मैदानावर एका गोष्टीवरुन सरफराज खान आणि रॉबिन उथप्पामध्ये वाद झाला. त्यांचा हा वाद सामना संपल्यानंतरही सुरु होता. या संपुर्ण वादादरम्यान रॉबिन उथप्पा प्रचंड चिडलेला दिसत होता. इतकंच नाही तर सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेजेंटेशन कार्यक्रमातही दोघे वाद घालताना दिसत होते. 

वादानंतर चिडलेला रॉबिन उथप्पा सरफराज खानसोबत भांडण्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचला होता. उथप्पाने सरफराजवर हातही उचलला होता. पण तितक्यात एबी डिव्हिलिअर्स आणि अशोक डिंडाने त्याला अडवलं. याप्रकरणी आरसीबीने रॉबिन उथप्पाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. काही दिवसानंतर आपोआप हे प्रकरण शांत झालं.

 Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआयपीएल