मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वातील सर्व गोलंदाज घाबरायचे. पण सचिनलाच एकदा भारतीय संघातील खेळाडूंनी चागंलेच घाबरवले होते.
ही गोष्ट आहे ती १९९० सालची. जेव्हा सचिन गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत होता. पण तरीदेखील भारतीय खेळाडूंनी सचिनला यावेळी चांगलेच घाबरवले होते. हा सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला होता.
सचिनने या सामन्यात ११९ धावांची खेळी साकारत भारताला पराभवापासून परावृत्त केले होते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अनिर्णित राहीला होता. सचिनचे हे पहिले शतक ठरले होते. पण त्यानंतरही सचिनला संघातील खेळाडू घाबरवत होते.
शतक झाल्यानंतरही खेळाडू सचिनला का घाबरवत होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टीचे कारण ठरले होते पत्रकार परीषद. सचिनने शतक झळकावल्यामुळे त्याला पत्रकार परिषदेला जावे लागणार होते. त्यामध्येच सचिन हा मितभाषी. त्यामुळे खेळाडूंनी पत्रकार तुला भयंकर प्रश्न विचारणार, असे म्हणत सचिनला घाबरवले होते.