क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत

खुद्द MS धोनीनं शेअर केला साक्षीसंदर्भातील तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:42 PM2024-10-28T15:42:21+5:302024-10-28T15:49:39+5:30

whatsapp join usJoin us
When Sakshi Dhoni Gives Cricket Gyan To Great Ms Dhoni Watch Video | क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत

क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध रणनिती आखण्यात माही अर्थात महेंद्रसिंह धोनीला तोड नव्हती. DRS ला "धोनी रिव्ह्यू सिस्टीम" अशी मिळालेली उपमा क्रिकेटच्या मैदानात त्याच्या निर्णयाला चॅलेंज देणं किती मुश्किल होते, याच एक उत्तम उदाहरण आहे. पण साक्षीसमोर त्याची अवस्था देखील इतर सामान्य नवऱ्यांप्रमाणेच असते. खुद्द धोनीनंच यासंदर्भातील खास किस्सा शेअर केला आहे.

खुद्द MS धोनीनं शेअर केला साक्षीसंदर्भातील तो किस्सा

एमएस धोनीचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये धोनीनं पत्नी साक्षीसोबत वनडे मॅच बघत असताना घडलेला एक खास किस्सा शेअर केला आहे. यात धोनी हा पत्नी साक्षीनं क्रिकेटच्या मुद्यावरून आपल्यासोबत हुज्जत कशी घातली ते सांगताना दिसून येते.   

इथं पाहा MS धोनीचा व्हायरल व्हिडिओ


जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात धोनी म्हणतो की, "मी आणि साक्षी क्रिकेटवर फारशी चर्चा करत नाही. एकदा मी साक्षीसोबत एक वनडे मॅच बघत बसलो होतो. साक्षीला तसा क्रिकेटमध्ये फारसा रस नसतो. पण त्या मॅचमध्ये वाइड बॉलवर फलंदाजाला स्टंपिग आउट दिल्यावर तो नॉट आउट आहे, यावर साक्षी  जोर देताना दिसली." 

धोनीनं समजावून सांगितला नियम, पण साक्षीला ते अजिबात नाही पटलं

सध्याच्या घडीला बहुतांश वेळा मैदानातील अंपायरनं निर्णय दिल्यावरही थर्ड अंपायरचा सल्ला घेतला जातो. या मॅचमध्येही तसेच घडलं. पण तिसऱ्या अंपायरचा निर्णय येण्याआधीच खेळाडूही मैदान सोडताना दिसला. पण तरीही साक्षीला तो आउट नाही, असेच वाटत होते. थर्ड अंपायर त्याला परत बोलवेल असं तिने मला बोलून दाखवले. कारण वाइड बॉलवर स्टंम्पिग आउट नसते, असे ती म्हणाली. यावर धोनीनं तिला नियम समावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण साक्षीला धोनीच काही पटलंच नाही. 

जे घडलं ते चुकीच होत यावर साक्षी होती ठाम
 
धोनी पुढे म्हणताना दिसते की, "मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की, वाइड बॉलवर फलंदाजाला स्टंपिंगच्या रुपात आउट दिले जाते. नो बॉल असेल तर त्याला फायदा मिळतो. यावर साक्षी म्हणाली की, तुला काहीच माहिती नाही. तोपर्यंत दुसरा खेळाडूही मैदानात आला. फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तरी  साक्षीला वाटत होते की, या फलंदाजाच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय." 

 

Web Title: When Sakshi Dhoni Gives Cricket Gyan To Great Ms Dhoni Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.