पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला असतोच... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक कारणाने आफ्रिदी चर्चेत राहिला आहे. नुकतच त्याने एका पाकिस्तनी शो मध्ये सहभाग घेतला आणि त्यात त्याने आपल्याला LBW चा अर्थच माहीत नसल्याचे मान्य केले. फैजल कुरेशीच्या सलाम जिंदगी या कार्यक्रमात आफ्रिदी आला होता.
या कार्यक्रमात आफ्रिदीला काही खेळ खेळायला लावले. त्यात कानावार हेडफोन लावून मोठ्या आवाजाने संगीत लावून समोरची व्यक्ती काय बोलतेय हे ओळखण्याचा खेळ होती. त्यात त्याला लेग बिफोर विकेट ( LBW) हा शब्द विचारण्यात आला. आफ्रिदीला तो ओळखता आला नाही. त्याने लेग व बिफोर हे शब्द ओळखले, परंतु त्याला विकेट ओळखता आले नाही. त्यानंतर हेडफोन काढून त्याला हा शब्द सांगण्यात आला. तेव्हा त्याने विचारलं की, लेग बिफोर विकेट काय असते? हे क्रिकेटमधील कोणता शब्द आहे?.
तो पुढे म्हणाला, मी पहिल्यांदाच हा शब्द ऐकतोय. लेग बिफोर विकेट हा क्रिकेट संबंधित शब्द आहे हे मला आजच माहीत पडतंय. मला वाटलं ते हिट विकेट असावं.
२० वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या आफ्रिदीला LBW म्हणजे काय हे माहीत नसल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटिझन्सनी शाळा घेतली. आफ्रिदीने घेतलेल्या ५९७ विकेट्सपैकी ५४० या LBW ने घेतल्या आहेत.
Web Title: When Shahid Afridi admitted he doesn't know what LBW stands for, Video Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.