क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांची हटके फटकेबाजी, गोलंदाजाची भन्नाट शैली तर क्षेत्ररक्षकांची चपळाई हे नेहमीच साऱ्यांच्या चर्चेचे विषय असते... अरे त्या फलंदाजानं कसला हाणलाय... गोलंदाजानं भारी यॉर्कर टाकलाय... फिल्डींगमध्ये तर तो खेळाडू बाप निघाला.. हे कौतुकाचे शब्द नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या मुखातून बाहेर पडत असतात. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही खेळाडूचं नाही तर चक्क अम्पायरचं कौतुक कराल. बिली बॉडेन यांच्या अम्पायरींग शैलीचे सर्वांना अप्रूप वाटायचे... त्यात आता महाराष्ट्राच्या या अम्पायरची भर पडली आहे. महाराष्ट्रातील अम्पायरनं Wide बॉलचा निर्णय अशा पद्धतीने दिला की त्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुरंदर प्रीमियर लीगमधील एका सामन्यातील हा व्हिडीओ आहे. Wide बॉलचा निर्णय देताना हा अम्पायर चक्क डोक्यावर उलटा झाला अन् दोन्ही पायांनी हा निर्णय दिला. त्यामुळे त्याला कुणी योगगुरू म्हणतंय, तर कुणी जिमनॅस्टपटू... पुरंदर प्रीमियर लीगमधील सामन्यातील या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. समालोचन करणाऱ्यांनी या अम्पायरच्या निर्णय देण्याच्या पद्धतीचे कौतुक केले, शिवाय त्याला टाळ्यांची दाद देण्याचे आवाहनही प्रेक्षकांना केले.
पाहा व्हिडीओ..