भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यानं हे यश एका रात्री मिळवलेलं नाही, त्यामागे अथक परिश्रम आहेत. त्याच संघर्षाबद्दल बोलताना कोहलीनं एक किस्सा सर्वांना सांगितला. संघात निवड झाली नाही म्हणून रात्रभर रडलो होतो, असे कोहलीनं
'अनअकादमी'तर्फे ऑनलाईन क्लासमध्ये कोहली आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी त्यांच्या संघर्षाबाबत सर्वांना सांगितले. कोहली म्हणाला,''कोरोना व्हायरसच्या संकटाची एक सकारात्मक बाब अशी की, समाज उदार झाला आहे. या व्हायरसशी संघर्ष करणाऱ्या पोलीस, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. हे संकट गेल्यानंतरही हिच उदारता आणि आदर कायम राहील, अशी अपेक्षा.'' अनुष्का म्हणाली,''या संकटानं बरंच काही शिकवलं. आरोग्य सेवक आणि अन्य लोकं या संकटाशी संघर्ष करत नसते, तर आपल्याला जीवनावश्यक वस्तूही मिळाल्या नसत्या. समाज म्हणून आपण अधिक एकत्र आलो आहोत.''
यावेळी विराटला त्याच्या आयुष्यातील सर्वात रडवेला क्षण कोणता, असे विचारले. त्यावर कोहली म्हणाला,''सुरुवातीच्या काळात दिल्ली संघात माझी निवड होत नव्हती. तेव्हा मी रात्रभर रडत होतो आणि माझी निवड का होत नाही, असं मी प्रशिक्षकांना विचारायचो.''
कोहलीनं 18 फेब्रुवारी 2006मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पम केले. तेव्हा तो केवळ 18 वर्षांचा होता. त्या सामन्यात कोहलीनं केवळ 10 धावा केल्या. पण, अथक परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर कोहलीनं दोन वर्षांत टीम इंडियात स्थान पटकावले. 2008 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याच्या नावावर 70 शतकं आहेत.