ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहली एवढा आक्रमक आहे की तो कुणाची माफी मागेल, असे वाटत नाही. पण कोहलीलाही एकदा सपशेल माफी मागावी लागली होता.
लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली एवढा आक्रमक आहे की तो कुणाची माफी मागेल, असे वाटत नाही. पण कोहलीलाही एकदा सपशेल माफी मागावी लागली होता. आपल्या कृत्याबद्दल त्याला खंत वाटली होती. विस्डन या मासिकाबरोबर बोलताना कोहलीने ही गोष्ट सांगितली आहे.
ही गोष्ट आहे 2012 सालची. भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. सिडनीमध्ये कसोटी सामना सुरु होता. भारताची गोलंदाजी सुरु होती. कोहली हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी प्रेक्षकांनी कोहलीची हुर्यो उडवायला सुरुवात केली. कोहली काही काळ शांत राहीला. पण आक्रमक कोहलीचा बांध फुटला. त्याने प्रेक्षकांना आपल्या हाताचे मधले बोट दाखवून निषेध नोंदवला. कोहलीने केलेली गोष्ट चुकीचीच होती. जंटलमन खेळात अशा गोष्टी घडायला नको होत्या. पण कोहलीकडून ते घडलं आणि त्याला दुसऱ्या दिवशी सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी बोलावून घेतले.
कोहली मदुगले यांच्या समोर उभा राहिला. त्यावेळी मदुगले यांनी विचारलं, काल तू सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा नेमकं काय झालं? कोहलीने त्यावर काही झालं नाही, असं सांगितलं. त्यावेळी मदुगले यांनी कोहलीच्या समोर एक वर्तमानपत्र ठेवलं आणि पहिल्या पानावरची बातमी वाचायला सांगितली. त्याबातमीमध्ये कोहलीचं वर्तन आणि खेळ याबद्दल एक बातमी छापून आली होती. आपल्याकडून नेमकं काय घडलं हे कोहलीला तेव्हा कळलं. त्यानंतर कोहली म्हणाला की, " माझ्याकडून घडलेले कृत्य वाईट आहे. मला माफ करा. मला माझ्या वर्तनाबद्दल खंत आहे. माझ्यावर बंदी आणू नका. " त्यानंतर मात्र कोहलीने मैदानात असे कृत्य केले नाही.
Web Title: When Virat Kohli said ... I'm embarrassed, forgive me ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.