मुंबई - भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मंगळवारी केलेल्या ट्विटने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तेंडुलकरने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हा तो ट्विट होता. मात्र त्याची शैली पाहून तो नक्की तेंडुलकरनेच केला आहे की, त्याच्या अकाऊंटवरून वीरेंद्र सेहवागने मॅसेज पोस्ट केला आहे, अशी शंका नेटिझन्सच्या मनात उपस्थित झाली.
तेंडुलकर आणि मलिंगा यांनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २००८ ते २०१३ या कालावधीत मुंबई इंडियन्स संघातून एकत्र खेळले. मंगळवारी मलिंगाचा ३५वा वाढदिवस होता आणि तेंडूलकरने माजी सहकाऱ्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या." लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीचा सामना करताना मी नेहमी सांगतो.. केसांकडे नका पाहू, चेंडूकडे पाहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा," असे तेंडुलकरने ट्विट केले.
नेहमी साध्या आणि सोप्या शब्दात ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या तेंडुलकरच्या या मॅसेजने मात्र नेटिझन्सना बुचकळ्यात टाकले. हे ट्विट तेंडुलकरनेच केले आहे का, असा सवालच अनेकांनी विचारून टाकला. अशा विनोदी शैलीचे ट्विट तेंडुलकरकडून कधीच करण्यात आले नसल्याने त्याच्या अकाऊंटवरून सेहवाग ट्विटर करत नाही ना, अशीही अनेकांनी शंका उपस्थित केली.
Web Title: When Virender Sehwag tweeted on Sachin Tendulkar account ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.