Mohammad Rizwan's big revelation - पाकिस्तानचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा तिन्ही फॉरमॅटमधील संघाचा अविभाज्य सदस्यांपैकी एक आहे. मागील वर्षभरात रिझवानने उल्लेखनीय कामगिरी करताना अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याने कर्णधार बाबर आझमसह ट्वेंटी-२०त सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि वर्ष २०२१मध्ये वर्चस्व गाजवले. या जोडीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली आणि कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा १० विकेट्सने पराभव केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला २० षटकांत ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारता आली होती आणि रिझवान-बाबर जोडीने १३ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.
Big News : केन विलियम्सननं न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडलं; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा निर्णय
स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला दिलेल्या एका मुलाखतीत रिझवानने खुलासा केला की बाबरसोबत भारताविरुद्धच्या भागीदारीने पाकिस्तानमधील त्याचे आयुष्य कसे बदलले. “जेव्हा आम्ही भारताविरुद्ध जिंकलो तेव्हा मला वाटले की हा फक्त माझ्यासाठी सामना होता, कारण आम्ही तो सहज जिंकला. पाकिस्तानात आल्यावर त्याचा अर्थ मला नव्याने कळला. जेव्हा मी दुकानात गेलो तेव्हा ते माझ्याकडून पैसे घेत नव्हते. ते म्हणायचे, 'तू जा, तू जा. मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही,'' असे रिझवानने माईक आथर्टनला सांगितले.
"लोक म्हणत होते की, 'येथे तुमच्यासाठी सर्व काही मोफत आहे'. त्या सामन्यानंतर सर्व पाकिस्तानींनी दिलेले ते प्रेम होते,” असे रिझवान म्हणाला. रिझवान सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग आहे. पाहुण्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बेन स्टोक्सच्या खेळाडूंनी मुलतानमधील दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर २६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
मागच्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर भारताने यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. विराट कोहलीने कारकीर्दितील अविस्मरणीय खेळी करताना पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. हॅरीस रौफला त्याने मारलेले दोन षटकार गेम चेजिंग ठरले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"