व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये सोमवारी अचानक तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरची सेवा खंडित झाली आहे. अँड्रॉईड, आयओएससोबतच डेस्कस्टॉपवरही समस्या उद्भवत असल्यानं वापरकर्ते हैराण झाले. कुटुंबीयांशी, मित्र मेत्रीणींशी संवाद साधण्याचं सोप माध्यम म्हणून व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये हे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जिवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. अशात याच सेवा खंडित झाल्यावर एकमेकांशी संवाद साधावा कसा, याचा उत्तम जुगात बाप लेकानं शोधला..
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नईच्या ५ बाद १३५ धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीचे ४ फलंदाज ९३ धावांवर माघारी परतले आहेत. अशात या बाप-लेकानं व्हॉट्स ऍप बंद झाल्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी DC vs CSK सामन्याची मदत घेतली. दिल्ली कॅपिटल्सच्या लाईव्ह कॉमेंट्री मध्ये विन्नू नावाच्या मुलाच्या वडिलांनी एक मॅसेज टाईप केला. त्यात त्यांनी लिहिलं की, व्हॉट्सऍप डाऊन झालं आहे, परंतु तू cricinfo ची कॉमेंट्री वाचत असशील हे मला माहित्येय. त्यामुळे कृपया माझा फोनचा रिचार्ज कर... त्यावर विन्नूनं भन्नाट उत्तर दिलं. त्यानं लिहिलं, Cricinfo वर कमेंट कशी लिहायची हे तुम्हाला माहित आहे, तर तुम्ही स्वतः रिचार्ज करू शकता.
लवकरात लवकर समस्या सुटेल
सर्व्हर डाऊन झाल्यानं गेल्या पाऊण तासापासून व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचा वापर करता येत नाहीए. अनेकांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांनाही त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला आहे. 'काहींना आमच्या सेवेचा वापर करताना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. तसदीबद्दल क्षमस्व,' असं ट्विट फेसबुक, व्हॉट्स ऍपनं केलं आहे.
Web Title: When WhatsApp and Facebook went down, father and son took the help of CSK vs DC match to communicate, see exactly how
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.