Join us  

India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर

India vs Bangladesh 1st Test Live Streaming Free: उद्यापासून रंगणार भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 6:39 PM

Open in App

India vs Bangladesh 1st Test Live Streaming Free: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची T20 मालिका उद्यापासून (१९ सप्टेंबर) सुरू होत आहे. आधी कसोटी मालिका आणि नंतर टी२० मालिका खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. जवळपास महिन्याभराच्या विश्रांतीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत, पहिला कसोटी सामना फुकटात कुठे पाहिला मिळू शकेल? किती वाजता पाहता येईल? या साऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

  • भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल?

- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी, १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

- भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. २०२१ नंतर चेपॉकमधील हा पहिलाच कसोटी सामना आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी सुरू होईल?

- भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर दाखवली जाईल?

- भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केली जाईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी कोणत्या टीव्ही चॅनेलवर दिसेल?

भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी स्पोर्ट्स 18-1 SD, स्पोर्ट्स 18-1 HD, स्पोर्ट्स 18-2 (हिंदी) टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी विनामूल्य कशी पाहायची?

तुम्ही JioCinema ॲप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी विनामूल्य म्हणजेच फुकटात पाहू शकता.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशजिओभारतबांगलादेश