Virat Kohli Phone : विराट कोहली कोणता फोन वापरतो माहित्येय?; भारतात अजून लाँचही नाही झाला, जाणून घ्या किंमत 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( virat Kohli) चे सोशल मीडियावर कोट्यवधी फॅन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामचाच विचार केल्यास त्याचे २० कोटी ९७ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:05 PM2022-07-28T13:05:18+5:302022-07-28T13:07:54+5:30

whatsapp join usJoin us
Which company smartphone used by former Indian cricket team captain Virat Kohli?, mysterious blue smartphone leaves fans confused | Virat Kohli Phone : विराट कोहली कोणता फोन वापरतो माहित्येय?; भारतात अजून लाँचही नाही झाला, जाणून घ्या किंमत 

Virat Kohli Phone : विराट कोहली कोणता फोन वापरतो माहित्येय?; भारतात अजून लाँचही नाही झाला, जाणून घ्या किंमत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( virat Kohli) चे सोशल मीडियावर कोट्यवधी फॅन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामचाच विचार केल्यास त्याचे २० कोटी ९७ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत... इंस्टाग्रामवर कमाईच्या बाबतितही विराट जगात तिसऱ्या, तर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातिल सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्येही तो आशियातून अव्वल स्थानी आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेला विराट कोहली मग नेमका फोन कोणता वापरत असेल, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय... त्याला कारणही तसेच आहे. विराटने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात तो निळ्या रंगाच्या फोनवर बोलताना दिसतोय... अनेकांना तो iPhone असेल असे वाटले, परंतु तो दुसऱ्याच कंपनीचा फोन आहे.

विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मा व मुलीसह युरोप दौऱ्यावर आहे. विराटने पोस्ट केलेल्या फोटोवर माझा आवडता निळा रंग, अशी कमेंट लिहिली आहे. तो नेमका कोणता फोन वापरतो याची उत्सुकता सुरू झाली.

 


विराट कोहलीच्या हातात दिसणारा फोन हा Vivo V25 असल्याचा दावा केला जातोय आणि भारतात तो अजून लाँच केलेला नाही. विराट कोहली हा Vivo चा सदिच्छादूत आहे आणि त्यामुळेच त्याला Vivoचा नवीन फोन लाँच होण्यापूर्वी मिळणे, यात काही नवीन नाही. विराटची ती पोस्ट म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असल्याचाही अनेकांनी दावा केला आहे. Vivo V25 Series १८ ऑगस्टला भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या सीरिजचे Vivo V25, Vivo V23e आणि  Vivo V25 Pro असे तीन प्रकार आहेत.

Vivo V25 मध्ये  पाठच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. मुख्य कॅमेरा ५० मेगा पिक्सल, तर अल्ट्रावाईड १२ मेगा पिक्सल आणि २ मेगा पिक्सलचा पोट्रेट कॅमेरा आहे. Snapdragon 778G किंव Mediatek Dimensity 1200 SoC या फोनमध्ये असेल. ४५००mAh बॅटरी, 44W किंवा 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट. ६.५६ इंचचा फुल HD+ डिस्पेल असे महत्त्वाचे फिचर्स असलेल्या या फोनची किंमत ४० हजाराच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.  

Web Title: Which company smartphone used by former Indian cricket team captain Virat Kohli?, mysterious blue smartphone leaves fans confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.