'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

मंकडिंग म्हटलं की सर्वात पुढे नाव येत आणि चेहरा आठवतो तो म्हणजे भारतीय संघाचा आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:57 AM2023-04-12T11:57:38+5:302023-04-12T11:58:51+5:30

whatsapp join usJoin us
'While watching the match, I even told my wife that...'; Ashwin reacts to Harshal Patel's monking | 'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनऊ सुपर जायट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा गोलंदाज हर्षल पटेल याने शेवटच्या षटकांत मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आजी- माजी खेळाडू सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देत आहेत. 

मंकडिंग म्हटलं की सर्वात पुढे नाव येत आणि चेहरा आठवतो तो म्हणजे भारतीय संघाचा आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचं. त्याने आयपीएलमध्ये जॉस बटलर नॉन स्ट्राइकवर असताना मंकडिंग केलं होतं, तेव्हा देखील सोशल मीडियावर मोठा चर्चा झाली होती. आता देखील हर्षल पटेलच्या मंकडिंगची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान अश्विनने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

अश्विन म्हणाला की, मी आणि माझी पत्नी प्रिती मॅच पाहत होता. यावेळी मी पत्नीला म्हणालो की, हर्षल पटेलने बिश्नोईला धावबाद करायला, हवे आणि त्याने करुन दाखवले. मी खूप आनंदी झालो. हर्षल पटेलच्या या धाडसाचे मी कौतुक करतो, असं अश्विनने सांगितले. तसेच एका चेंडूत एक जिंकण्यासाठी एक धाव हवी असल्यास नॉन स्टाइकवरील खेळाडू लवकर क्रिज सोडून धावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाने असं करायला हवं, असं मत अश्विने यावेळी व्यक्त केलं. 

दरम्यान, शेवटच्या चेंडूपूर्वी कर्णधार फॅफ आणि हर्षल पटेल यांच्यात संभाषण झाले. यानंतर हर्षल गोलंदाजी करायला गेला. बिष्णोई नॉन स्ट्राइकवर होता. अशा स्थितीत हर्षलने हुशारी दाखवत मंकडिंगचा प्रयत्न करत बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न चुकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने थ्रो करून बिश्नोईला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, चेंडूही स्टंपला लागला. आऊटचे अपील अंपायरने फेटाळले.

६ धावांची पेनल्टी द्या-

सदर प्रकरणावर इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि चेन्नई सुपरकिग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यांनी देखील आपले मत व्यक्त केलं आहे. बेन स्टोक्स ट्विट करत म्हणाला की, पंचांनी याबाबत हुशारीने वागलं पाहिजे. कोणत्याही फलंदाजाने लवकर क्रीज सोडल्यास ६ रनाची पेनल्टी द्यायला हवी. असे केल्यास कोणताही खेळाडू लवकर क्रीज सोडणार नाही, आणि यावरुन पुढे वाद होणार नाही, असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे.

Web Title: 'While watching the match, I even told my wife that...'; Ashwin reacts to Harshal Patel's monking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.