विराट कोहलीने नेमके कुणाच्या सांगण्यावरू भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले? यासंदर्भात आता खुद्द बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकताच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पराभव झाला. यानंतर आता पुन्हा एकदा विराट कोहलीला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनविण्याची मागणी सुरू झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने अचानकपणे भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले होते.
विराटनं कुणाच्या सांगण्यावरून सोबडलं होतं कसोटी कर्णधारपद -विराटने कुणाच्या सांगण्यावरून भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले? यासंदर्भात सौरव गांगुलीने स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. गांगुली म्हणाला, भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वतः विराटचाच होता. त्याने स्वतःच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा 1-2 ने पराभव झाल्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले होते.
रोहित शर्मा अजूनही कर्णधार म्हणून उत्तम पर्याय -गांगुली म्हणाला, 'विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा BCCI बिलकुलच तयार नव्हते. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्या कडे उत्तम पर्याय होता. मला रोहित शर्माच्या नेतृत्वावर अत्यंत विश्वास होता. आयपीएल जिंकणे, हे वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षाही अवघड काम आहे आणि पाचवेळा आयपीएल चॅम्पिअन होणे छोटी गोष्ट नाही. आयपीएलमध्ये आपल्याला 14 सामने खेळावे लागतात. यानंतर, प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी तककरून फायनलमध्ये जावे लागते. मला वाटते, रोहित शर्मा अजूनही कर्णधार म्हणून उत्तम पर्याय आहे.'