सुनील नरीनने ( Sunil Narine ) आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना सोलून काढले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराला अंगकृष रघुवंशीची ( Angkrish Raghuvanshi) साथ मिळाली आणि त्यानेही DC च्या गोलंदाजांची झोप उडवली. दोघांनी ४७ चेंडूंत १०३ धावांची भागीदारी आतापर्यंत केली आहे. रघुवंशीची फटकेबाजीपाहून मेंटॉर गौतम गंभीरसह सहमालक शाहरुख खानही प्रभावित झाला. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि KKR कडून अनकॅप्ड खेळाडूने झळकावलेले हे वेगवान अर्धशतक ठरले. तो २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा करून माघारी परतला. त्याने नरीनसह ४८ चेंडूंत १०४ धावा जोडल्या. अंगकृषने २०२२च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
कोण आहे अंगकृष रघुवंशी?अंगकृष रघुवंशीचे वडील अवनीश यांनी टेनिसमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर आई मलिका यांनीही देशासाठी बास्केटबॉल खेळला आहे. इतकंच नाही तर लहान भाऊ क्रिशगलाही खेळाचं वेड आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने टेनिसची निवड केली आणि स्पर्धांसाठी तो युरोपलाही गेला. दिल्लीत जन्मलेला अंगकृष जेव्हा पहिल्यांदा मुंबईत पोहोचला तेव्हा तो केवळ ११ वर्षांचा होता. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अवघ्या १७ वर्षांच्या अंगकृषने १९ वर्षांखालील विनू मांकड ट्रॉफीच्या चार सामन्यांत दोन अर्धशतकांसह एकूण २१४ धावा करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
मुंबईत स्थायिक होण्यापूर्वी गुरुग्रामचे प्रशिक्षक मन्सूर अली खान अंगकृषला प्रशिक्षण देत होते. विल्सन कॉलेज जिमखान्यात त्याच्यासोबत आठवडाभर प्रशिक्षण घेतल्यानंतर अभिषेक नायरने त्याला मुंबईला पाठवण्यास अंगकृषच्या कुटुंबियांना पटवून दिले. त्याचे काका साहिल कुकरेजा हे मुंबईचे माजी सलामीवीर आहेत, त्यांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी नायरशी संपर्क साधला. अंगकृष हा नायरच्या घरातच राहतो.
Web Title: Who is Angkrish Raghuvanshi? A Abhishek Nayar real hero behind KKR 18year old batter, his 25-ball fifty is the fastest ever half century by an uncapped cricketer for Kolkata Knight Riders.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.