शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट

या विकेटसह युवा गोलंदाजाने आयपीएलमध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणाऱ्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 20:36 IST2025-03-31T20:35:12+5:302025-03-31T20:36:14+5:30

whatsapp join usJoin us
Who is Ashwani Kumar? Mumbai Indians pacer Dismissing Ajinkya Rahane on first ball of IPL debut | शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट

शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Who is Mumbai Indians New Pacer Ashwani Kumar : मुंबई इंडियन्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या ताफ्यातून आणखी एका युवा क्रिकेटला पदार्पणाची संधी दिली. अश्वनी कुमार याने केकेआर विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्यातील पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर युवा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने अजिंक्य रहाणेच्या रुपात पहिली विकेट मिळवली. तिलक वर्माने एक उत्तम झेल टिपला अन् युवा गोलंदाजाचे पदार्पण एकदम खास ठरले.  आयपीएलमध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणारा तो १० गोलंदाज ठरलाय.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोण आहे अश्वनी कुमार?

अश्वनी कुमार हा पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. चतुराईनं बाउन्सर टाकण्यासह चेंडूतील गती व्हेरिएशनच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला चकवा देण्यात माहिर आहे. अश्वनी हा वाइड यॉर्करही एकदम परफेक्ट टाकतो. २०२४ मध्ये शेर ए पंजाब टी२० ट्रॉफी स्पर्धेत खेळताना या युवा गोलंदाजानं मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सला प्रभावित केले होते. यंदाच्या मेगा लिलावात संघाने त्याच्यावर डाव लावला अन् घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात हा मोहरा MI नं बाहेरही काढला.

Trent Boult First Over Wicket : ट्रेंट बोल्टचा तोरा पुन्हा दिसला; सुनील नरेनच्या पदरी भोपळा

मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त शॉपिंग
 
२०२२ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित अशा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पण या स्पर्धेत तो फक्त ४ सामनेच खेळला. ज्यात त्याला ३ विकेट्स मिळाल्या होत्या. याशिवाय अश्वनीने पंजाबसाठी दोन प्रथम श्रेणी आणि चार लिस्ट ए सामनेही खेळला आहे. २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने या खेळाडूसाठी ३० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. गत हंगामात तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. 

Web Title: Who is Ashwani Kumar? Mumbai Indians pacer Dismissing Ajinkya Rahane on first ball of IPL debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.