कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक

Asia Cup 2023, India vs Sri Lanka Live आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात २० वर्षीय युवा फिरकी गोलंदाज दुनिथ वेलालागेने ( Dunith Wellallage ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:55 PM2023-09-12T18:55:57+5:302023-09-12T18:56:31+5:30

whatsapp join usJoin us
Who is Dunith Wellallage? In front of whom Rohit, Kohli, Hardik and Gill knelt down, take five wickets against India in Super 4 match in Asia Cup 2023 | कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक

कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023, India vs Sri Lanka Live आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात २० वर्षीय युवा फिरकी गोलंदाज दुनिथ वेल्लालागेने ( Dunith Wellallage ) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्याने चकीत केले. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनही आपल्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत करू शकला नाही, ते या युवा गोलंदाजाने करून दाखवले. दुनिथने भारताविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या आणि वयाच्या २० व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो पहिला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज ठरला. भारताच्या आघाडीच्या ४ फलंदाजांना बाद करणारा तो पहिला श्रीलंकन फिरकी गोलंदाज ठरला. 

दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

१२व्या षटकात दुनिथने कहर केला
कोलंबोमध्ये श्रीलंकेसमोर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरादाखल रोहित आणि गिलने ९० धावांची भागीदारी केली. पण, डावाच्या १२व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने दुनिथकडे चेंडू सोपवता आणि पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला (१९ धावा) क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या विकेट्स घेतल्या.  


दुनिथ कोण आहे?
दुनिथचा जन्म कोलंबोमध्येच झाला होता. घरच्या मैदानावर त्याच्या करिष्माई गोलंदाजीमुळे त्याचे नाव सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहे. क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच दुनिथ चर्चेत आला होता तो २०२२च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत. जेथे त्याने ६ सामन्यांत सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या होत्या.  त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३० चेंडूत ११३ धावांची स्फोटक खेळीही केली होती. त्यामुळेच त्याला जून २०२२ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत १२ सामन्यांत १३ बळी घेतले आहेत. आज भारताविरुद्ध त्याने ५ विकेट्स घेऊन कमाल केली. 


वन डे सामन्यात भारताविरुद्ध ५ विकेट घेणारे श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन: 7/30
अकिला धनंजय - 6/54
अजंथा मेंडिस- 6/13
डुनिथ वेल्लालगे - 5/40
 

Web Title: Who is Dunith Wellallage? In front of whom Rohit, Kohli, Hardik and Gill knelt down, take five wickets against India in Super 4 match in Asia Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.