भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड हे समीकरण काही नवीन नव्हते. परंतू नव्या पिढीच्या क्रिकेटरनी त्यापुढचे पाऊल टाकले होते. बार डान्सर, चिअर लीडर्स, रीलस्टार, कोरिओग्राफर यांच्याशी सूत जुळवून त्यांनी लग्नही केले होते. यात काहींचे घटस्फोट झालेत तर काही त्या मार्गावर असल्याची गरमागरम चर्चा होत आहे. हार्दिक पांड्या, महोम्मद शमीनंतर आता तिसरा नंबर लागण्याची शक्यता आहे ती युजवेंद्र चहल याची.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आता रंगू लागली आहे. धनश्रीने एका फोटोने चहलच्या आयुष्यात एवढी हलचल माजवलीय की या दोघांच्या चाहत्यांत दोन गट पडले आहेत. काहीजण धनश्रीला नको नको ते बोलत आहेत. तर काहीजण एखाद्या पुरुषासोबत फोटो टाकला तर काय बिघडले असे म्हणत तिची पाठराखण करत आहेत. या सगळ्यात धनश्रीने ज्या तरुणासोबत फोटो टाकला तो कोण अशी चर्चा रंगू लागली आहे.
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. एका बाजूला सोशल मीडियावर हे कपल विभक्त होणार असल्याची चर्चा रंगत असताना इन्स्टाग्रामवरून दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची गोष्ट चर्चेत आली. चहलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धनश्री वर्माचे सर्व फोटोही डिलिट केल्याचे दिसून आले. दुसरीकडे धनश्री वर्माच्या इन्टाग्राम अकाउंटवर मात्र चहलसोबतचे काही खास फोटो दिसत आहेत.
धनश्री वर्माने प्रतीक उतेकर या कोरिओग्राफरसोबत क्लोजअप फोटो इन्स्टा स्टेटसला ठेवला होता. प्रतीक उतेकरचे इन्स्टा अकाऊंट पाहिले असता त्यावर मलायका अरोरासोबतही अशा क्लोजअपमधील फोटो आहेत. परंतू, मलायकाशी वेगळे संबंध आणि धनश्रीच्या फोटोत लोकांना वेगळे संबंध दिसत आहेत. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटांच्या चर्चा सुरु असतानाच हा फोटो धनश्रीने पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
फोटोमध्ये दोघांनी मॅचिंग ब्लॅक आउटफिट घातले होते. हा फोटो झलक दिखला जा मधील सीनसारखा असल्याचे दिसत आहे. हा क्षण पार्टीनंतरच्या सेलिब्रेशनचा होता, असे सांगितले जात आहे. धनश्री आणि चहलचा घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या ठरल्या तर आताच्या काळातील घटस्फोट होणाऱ्या क्रिकेटरमध्ये चहल चौथा क्रिकेटर ठरणार आहे.
Web Title: Who is he with Yuzvendra Chahal's wife Dhanashree Varma pratik utekar? This photo is the reason for the divorce, if it happens...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.