Join us  

कोण आहे इब्राहिम झाद्रान... ज्याने मोडला भारताच्या शुबमन गिलचा मोठा विक्रम

श्रीलंकेला पहिल्या वन डे मध्ये अफगाणिस्तानने दिली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 2:45 PM

Open in App

Ibrahim Zadran Shubman Gill : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 2 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 6 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर 269 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी 6 गडी आणि 19 चेंडू राखून 46.5 षटकांत पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या या विजयाचा नायक ठरला अवघ्या 21 वर्षांचा इब्राहिम झाद्रान. त्याने 98 धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक २ धावांनी हुकले नाही पण तरीही झाद्रानने भारताच्या फॉर्मात असलेल्या शुभमन गिलचा विक्रम मोडला.

21 वर्षीय इब्राहिम झद्रानने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 4 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटीत, झद्रानने तीन अर्धशतकांसह 44.5 च्या प्रभावी सरासरीने 356 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 66.4 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. झाद्रानने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्या डावात अर्धशतक केले. त्या खेळीच्या जोरावर झाद्रान हा अर्धशतक झळकावणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एक ठरला होता. पण आज त्याने गिलचा विक्रम मोडीत काढला.

शुभमन गिलचा विक्रम मोडला

श्रीलंकेविरुद्ध ९८ धावांची खेळी खेळत इब्राहिम झाद्रानने अवघ्या ९ वन डे डावांत ५०० धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 500 धावा करणारा तो संयुक्त दुसरा खेळाडू बनला. अशा परिस्थितीत त्याने भारताचा युवा आणि स्टार खेळाडू शुभमन गिलचा विक्रमही मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्यासाठी गिलने 10 डाव घेतले होते. झाद्रानने नऊ डावातच पराक्रम केला. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा यानेमन मलान अव्वल आहे. त्याने हा पराक्रम अवघ्या 7 डावात केला होता.

टॅग्स :शुभमन गिलअफगाणिस्तानश्रीलंका
Open in App