IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने आजच्या लढतीत दणक्यात सुरूवात केली आहे. DC चा संघ मागच्या सामन्यातील ड्रामा विसरून कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. दिल्लीकडून आज पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने ( Chetan Sakariya) पहिल्याच षटकात कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) मोठा धक्का दिला. आरोन फिंचचा ( ३) त्रिफळा उडवून दिल्लीच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. त्याच दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्स स्टँडमध्ये एका सुंदरीने सर्वांचे लक्ष वेधले. खास रिषभ पंतला ( Rishabh Pant) चिअर करण्यासाठी ती स्टेडियममध्ये आली होती.
कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे दिल्लीला मोठे धक्के बसले होते, परंतु आता त्यातून संघ सावरला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) याने कोरोनावर मात केली असून तो आज मैदानावर पुन्हा परतला आहे. दिल्लीच्या ताफ्यात एकीकडे आनंदाची वार्ता असताना प्रमुख गोलंदाजाला दुखापतीमुळे मुकावे लागले आहे. त्याच्याजागी चेतन सकारिया आज दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. कोलकाताच्या ताफ्यातही तीन बदल करण्यात आले असून दोन नवीन चेहरे संघात दिसणार आहेत. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सामना सुरू होण्याआधीच कॅमेरामनने त्या सुंदरीकडे कॅमेरा वळवला होता. ती सुंदरी म्हणजे रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी ( Isha Negi) आहे. सकारियाने विकेट घेतल्याने कॅमेरामनचे लक्ष पून्हा इशाच्या जल्लोषाकडे गेले आणि त्याने कॅमेरात तो कैद केला. त्यानंतर पाचव्या षटकात अक्षर पटेलने KKRला आणखी एक धक्का देताना वेंकटेश अय्यरला ( ६) बाद केले. कोलकाताची अवस्था २ बाद २२ अशी झाली होती. पाहा व्हिडीओ...
कोण आहे इशा नेगी?इशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील देहरादूनची आहे. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. इशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. इशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. काही पोशाख पाश्चिमात्य असतात तर काही वेळा ती पारंपारिक पोशाखातही फोटो पोस्ट करते.इशा बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. इशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. इशा श्रीमंत राजपूत कुटुंबातून असून तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.इशाचे शालेय शिक्षण देहरादूनमधील एका कॉन्व्हेंट शाळेत तर नॉयडाच्या अमिटी महाविद्यालयातून ती कला शाखेची पदवीधर आहे. पदवीचे शिक्षण झाल्यावर तिने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं असून ती स्वत:देखील एक यशस्वी उद्योजिका आहे.