IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : २२ वर्षीय फलंदाज नेहाल वढेरा ( Nehal Wadhera) हा आज मुंबई इंडियन्ससाठी संकटमोचक ठरला. ३ बाद १४ अशी अवस्था असताना नेहालने सूर्यकुमार यादवसह ( २६) ५५ धावांची भागीदारी केली. वढेराने ५१ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावा करून मुंबईला १३८ धावांपर्यंत पोहोचवले. वढेराचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला आहे.
पंजाब राज्य आंतरजिल्हा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वढेराने जादुई खेळी खेळली होती आणि ती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लुधियानाकडून खेळताना त्याने भटिंडाविरुद्ध ५७८ धावांची खेळी केली आणि ज्यात त्याने ४२ चौकार आणि ३७ षटकार मारले. चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लुधियानाच्या संघाने भटिंडाला ८८० धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु भटिंडाचा संघ केवळ ११७ धावाच करू शकला.
त्याची ही खेळी पाहून चाहते त्याची तुलना युवराज सिंगसोबत झाली होती. वढेरा युवराज सिंगचा मोठा चाहता आहे आणि त्याला आपला आदर्श मानतो. वढेरा भारताकडून अंडर-१९ क्रिकेटही खेळला आहे. जुलै २०१८ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर त्याने २ दमदार अर्धशतके झळकावली. २०१७-१८ कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने ६ अर्धशतकांच्या मदतीने ५४० धावा केल्या होत्या. ४ सप्टेंबर २००० रोजी लुधियाना येथे जन्मलेल्या वढेराला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. वढेराने ५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २ शतकांसह ३७६ धावा केल्या आहेत, तर ट्वेंटी-२० ७ सामन्यांत ६७ धावा त्याच्या नावावर आहेत.
Web Title: Who is Nehal Wadhera? he scored 64 in 51 balls with 8 fours and a six. Came in when MI were 14/3. A mature innings by Punjab boys
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.