Who is Sai Sudharsan? गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावांनी मॅच फिरवली. वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. पण, आजचा हिरो ठरला तो साई सुदर्शन... त्याला IPL मध्ये २० लाख मिळतात, तर तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये कोवाल किंग्स २१.६ लाख देतात.
Record Break : CSK वर 'सुदर्शन'चक्र! शुबमन गिल, वृद्धीमान साहा, साई यांनी नोंदवले मोठे विक्रम
२१ वर्षीय साई सुदर्शन हा डावखुरा फलंदाज आहे आणि आयपीएल २०२२ मध्ये त्याला २० लाखांच्या मुळ किमतीत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. तामीळनाडू प्रीमिअर लीग २०२१मध्ये साई सुदर्शनने ८ डावांत ७१.६०च्या सरासरीने ३५८ धावा केल्या होत्या आणि त्या पर्वात तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. साई सुदर्शनचे वडील भारद्वाज यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आई उषा भारद्वाज यांनी व्हॉलीबॉलमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, हा क्रिकेटच्या प्रेमात पडला.
आयपीएल २०२२ पर्यंत पोहोचण्यासाठी, साई सुदर्शनने प्रथम वयोगटातील क्रिकेटमध्ये धावा करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याला यशस्वी जैस्वालसह २०१९-२० साली १९ वर्षांखालीली चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत अ संघासाठी सलामीची संधी मिळाली. साई सुदर्शन गरज असेल त्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करू शकतो. तो लेगस्पिनरही आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या बंगालविरुद्धच्या सामन्यात मुरुगन अश्विनच्या अनुपस्थितीत संघाला लेगस्पिनरची गरज असताना त्याने गोलंदाजी करून विकेट घेतली होती.
Web Title: Who is Sai Sudharsan? DO YOU KNOW? Sai Sudharsan earns more from Tamil Nadu Premier League than Indian Premier League, watch his today inning, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.