Who is Shashank Singh? IPL 2022 SRH vs GT Live Updates : ४, २, १, ६, ६, ६ !; शशांक सिंग IPL मध्ये प्रथमच फलंदाजीला उतरला अन् नुसता धुमाकूळ घातला, Video 

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : सनरायर्झस हैदराबादने संथ सुरूवातीनंतरही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:05 PM2022-04-27T22:05:27+5:302022-04-27T22:09:11+5:30

whatsapp join usJoin us
Who is Shashank Singh? IPL 2022 SRH vs GT Live Updates : 4,2,1,6,6,6 by Shashank Singh in his first 6 balls in his IPL, 3 consecutive sixes against Lockie Ferguson, Video  | Who is Shashank Singh? IPL 2022 SRH vs GT Live Updates : ४, २, १, ६, ६, ६ !; शशांक सिंग IPL मध्ये प्रथमच फलंदाजीला उतरला अन् नुसता धुमाकूळ घातला, Video 

Who is Shashank Singh? IPL 2022 SRH vs GT Live Updates : ४, २, १, ६, ६, ६ !; शशांक सिंग IPL मध्ये प्रथमच फलंदाजीला उतरला अन् नुसता धुमाकूळ घातला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : सनरायर्झस हैदराबादने संथ सुरूवातीनंतरही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. अभिषेक शर्मा व एडन मार्कराम यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीसोबत ९१ धावांच्या भागीदारीने SRHचा डाव सावरला. त्यात आज मैदानावर उतरलेल्या शशांक सिंगने ( Shashank Singh) अखेरच्या षटकात वादळी खेळी केली. ६ चेंडूंचा सामना करताना त्याने ४, २, १, ६, ६, ६ अशी फटकेबाजी करताना २५ धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. 

केन विलियम्सन ( ५) व राहुल त्रिपाठी ( १६) माघारी परतल्यानंतर  अभिषेक शर्मा व एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून हैदराबादच्या डावाला आकार दिला.  अभिषेक ४२ चेंडूंत ६ चौकार  व ३ षटकारांसह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक २८५ धावा या अभिषेकच्या नावावर आहेत. त्यानंतर तिलक वर्मा ( २५०) व राहुल त्रिपाठी ( २२८) यांचा क्रमांक येतो. मार्कराम ५६ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) बाद झाला. मार्को येनसेन व शशांक सिंग यांनी अखेरच्या षटकात चार षटकार खेचून २५ धावा कुटल्या आणि हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. शशांक ६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला ( ३ षटकार  व १ चौकार). मोहम्मद शमीने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

पाहा व्हिडीओ..

कोण आहे शशांक सिंग?
आयपीएल २०२२मध्येसनरायझर्स हैदराबादने २० लाख रुपयांत शशांक सिंगला आपल्या ताफ्यात घेतले. २१ नोव्हेंबर १९९१ सालचा त्याचा जन्म. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने छत्तीसगड व मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १ एप्रिल २०१५मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ३२ सामन्यांत १४२च्या स्ट्राईक रेटने ४२४ धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. याआधी तो दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स या संघांचा सदस्य होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 

Web Title: Who is Shashank Singh? IPL 2022 SRH vs GT Live Updates : 4,2,1,6,6,6 by Shashank Singh in his first 6 balls in his IPL, 3 consecutive sixes against Lockie Ferguson, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.