Join us  

Suryakumar Yadav: ही व्यक्ती आहे सूर्यकुमार यादवची Secret Coach ; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज!

सूर्यकुमारच्या अजब बॅटिंगचे सारेच फॅन झालेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 4:05 PM

Open in App

Suryakumar Yadav Secret Coach: सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज शतक आणि भारतीय गोलंदाजांची शिस्तबद्ध कामगिरी यांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला शेवटच्या टी२० मध्ये ९१ धावांनी पराभूत केले आणि मालिका २-१ अशी जिंकली. सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. तसेच, ४५ चेंडूत शतकही झळकावले. सूर्यकुमारने केवळ सरळ रेषेतच नव्हे तर किपरच्या डोक्यावरून अनेक षटकार ठोकले. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर निवडण्यात आले. त्याच्या या खेळीचे चहुबाजूंनी कौतुक झाले. पण त्यातच, आता सूर्यकुमारच्या 'सिक्रेट कोच' बद्दल चर्चा रंगली आहे.

सूर्यकुमार यादवने अवघ्या २ वर्षात अनेक विक्रम केले. २ वर्षातच तो जगातील नंबर वन टी२० फलंदाज बॅट्समन बनला. एवढेच नाही तर तो भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक बनला असेही आपण म्हणू शकतो. संघ व्यवस्थापनानेही सूर्यावर विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत उपकर्णधार बनवण्यात आले होते. तो विश्वास सार्थ ठरवत त्याने एकट्याने भारताला २-१ अशी मालिका जिंकून दिली. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ५१ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर त्याने स्वत:च्या फिटनेसबद्दल आणि सिक्रेट कोचबद्दलही सांगितले.

सूर्याने अवघ्या ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. तिसर्‍या टी२० सामन्यात त्याचे अप्रतिम शॉट्स आणि फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सामन्यानंतर सूर्याने प्रशिक्षक राहुल द्रविडशी त्याच्या फिटनेसबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी BCCI TV वरील संभाषणादरम्यान त्याने आपल्या फिटनेसबद्दल सांगितले आणि या संभाषणात त्याच्या 'सिक्रेट कोच'चं रहस्यही उघड केलं. ज्या सिक्रेट कोचमुळे तो जगातील नंबर वन टी२० फलंदाज बनला, तो कोच दुसरा तिसरा कुणीही नसून त्याची पत्नी देविशा (Devisha Shetty) आहे, असे तो म्हणाला.

----

----

"लग्नाच्या नंतर माझ्या पत्नीने मला सुरूवातीपासूनच डाएटवर लक्ष देण्याचा आग्रह धरला होता. निरोगी आयुष्यासाठी सर्वाधिक फिट राहावे लागते असे ती मला सातत्याने सांगत राहायची. त्यामुळेच तिने माझ्या फिटनेसबाबत खूप काळजी घेतली. घरी आल्यावर आम्ही दोघे क्रिकेटवर खूप गप्पा मारायचो. मी अधिक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळण्यासाठी काय करू शकतो यावर आम्ही दोघे खूप वेळ चर्चा करायचो, ती मला अनेक वेळा काही सल्लेही द्यायची. त्यामुळे प्रत्येक वेळी खेळात सुधारणा करण्याची माझ्यात उर्मी असायची आणि मी प्रत्येक पाऊल पुढे कसे टाकू शकतो याचा विचार करण्यातही मजा यायची," असे सूर्यकुमार यादवने आपली पत्नी देविशा हिच्याबद्दल बोलताना सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App