Who Is The Greatest Indian Cricket Captain Of All Time : क्रिकेट हा आपला खेळ नसला तरी या खेळावर आणि खेळाडूंवर प्रेम करणारा मोठा चाहतावर्ग आपल्याकडे दिसून येतो. क्रिकेट जगतात सध्या भारतीय संघाचा बोलबालाही आहे. आता मग टीम इंडियाच्या कॅप्टन्सची चर्चा होणार नाही असे कसे होईल.
सर्वोत्तम कॅप्टन्सीच्या प्रश्नाव दिग्गजानं कपिल, धोनी अन् रोहितपेक्षाही घेतल वेगळं नाव '
भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण? हा प्रश्न विचारला तर बुहतांश क्रिकेट चाहत्यांच्या ओठावर कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांचे नाव येते. यामागचं कारण असं की, या तिघांनी भारतीय संघाला वर्ल्ड कप मिळवून दिला आहे. ही मंडळी आपल्या काळातील सर्वोत्तम कॅप्टन आहेत, यात शंका नाही. पण एका दिग्गज क्रिकेटरनं या तिघांना सोडून वेगळ्याच स्टार क्रिकेटरला सर्वकालीन सर्वोत्तम कॅप्टन म्हटलं आहे.
इंग्लंडच्या दिग्गजाला भावली दादाची 'दादागिरी'
पण माजी कर्णधार आणि पंच डेविड लॉयड यांनी भारतीय संघाच्या सर्वकालीन महान कर्णधारासंदर्भातील प्रश्नावर आपलं वेगळेच मत मांडलं आहे. टॉकस्पोर्टच्या युट्यूब चॅनलवर क्रिकेटवरील गप्पा गोष्टी केल्या. यावेळी भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान कर्णधारासंदर्भातील प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर या दिग्गजाने कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यापैकी कुणाचंही नाव घेता भारतीय संघाची बांधणी करणाऱ्या कॅप्टनचं नाव घेतलं आहे. तो स्टार आणि माजी भारतीय कॅप्टन दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सौरव गांगुली.
त्याच्या रुपानं भारतीय क्रिकेट संघाला मिळाला आक्रमक कर्णधार
डेविड लॉयल हे इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि पंच देखील आहेत. ते म्हणाले आहेत की, गांगुली कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघात एक आक्रमकता आली. गांगुली हे असं व्यक्तीमत्व होतं की, तो प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला भाग पाडायचा. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट सर्वोत्तम स्थानी आहे. त्यात सौरव गांगुलीचा मोठा वाटा आहे. त्याच्या आक्रमक नेतृत्व शेलीमुळे भारतीय क्रिकेटला एक वेगळी उंची मिळाली, असेही इंग्लंडच्या दिग्गजाने म्हटले आहे.
भारतीय संघ स्लेजिंगला प्रत्युत्तर द्यायला शिकला
यावेळी इंग्लंडच्या या माजी क्रिकेटरनं क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानातील गांगुलीच्या शर्टलेस सीनची आठवणही करुन दिली. "ते म्हणाले की, अँड्रू फ्लिंटॉफ याने मुंबईच्या मैदानातील विजयानंतर शर्ट काढून जल्लोष केला होता. याचा बदला गांगुलीनं लॉर्ड्सच्या मैदानात घेतला. गांगुलीच्या नेतृत्वातच भारतीय संघ स्लेजिंगला प्रत्युत्तर द्यायला शिकला." या गोष्टीमुळेच गांगुली भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम महान खेळाडू वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे.
Web Title: who is the greatest indian cricket captain of all time former england captain On Says Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.