बँकॉक - ऑट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉन याचा शुक्रवार चार मार्च रोजी अकाली मृत्यू झाल्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण हे हृदयविकाराचा तीव्र धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण तो एका रिसॉर्टमध्ये बेशुद्धावस्थेमध्ये सापडला होता. शेन वॉर्नच्या निधनानंतर तीन दिवसांनंतर एक महिला वॉर्नचा मृतदेह ठेवलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये बसल्याने चर्चेत आली आहे. आता थायलंड पोलीसही याबाबतचा तपास करत आहेत. दरम्यान, सदर महिला ही कथितपणे शेन वॉर्नची प्रशंसक होती. तसेच शेन वॉर्नचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेत असताना तिला रुग्णवाहिकेतून जाऊ दिले गेले.
News.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नच्या मृतदेहासोबत हे संभाव्य सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होते. व्हिडीओ फुटेजमध्ये दिसले की, एका जर्मन महिलेने अँब्युलन्समध्ये प्रवेश केला आणि तिने व्हॅनमध्ये ४० सेकंद घालवले. तिने सोबत फुलांचा गुच्छही घेतला होता. तिच्या वर्तनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावेळी स्थानिक आणि ऑस्ट्रेलियन पोलीसही तिथे उपस्थित नव्हते.
यादरम्यान, सांगण्यात आले की, थाई पोलिसांनी या जर्मन महिलेकडे चौकशी केली आहे. ती कोह समुई येथील रहिवासी असून, शेन वॉर्नची प्रशंसक आहे. ती शेन वॉर्नला अंतिम सन्मान देऊ इच्छित होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, थाई अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, सदर महिला ही शेन वॉर्नला वैयक्तिकरीत्या ओळखत होती. त्यामुळे त्यांनी तिला शेन वॉर्नला श्रद्धांजली देण्याची परवानगी दिली.