भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) प्रसिद्ध माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना रवी शास्त्रींनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुख्य कोच पदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते. कुंबळे 2016-17 मध्ये एका वर्षासाठी टीम इंडियाचा कोच होता. तेव्हा सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुलीच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेला शास्त्रीच्या जागी नियुक्त केले होते. परंतू, संघात कुंबळेविरोधात काही कारस्थान रचण्यात आले. यानंतर कुंबळेने राजीनामा दिला होता.
कर्णधार विराट कोहली याच्यासोबत मतभेद झाले होते. यामुळे पाकिस्तानविरोधातील चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडिया मुद्दाम हरल्याने कुंबळेने राजीनामा दिला होता. या घटनाक्रमाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला ही माहिती दिली आहे. अनिल कुंबळेच्या या राजीनामा प्रकरणात सुधारणा आवश्यक आहे. ज्या प्रकारे कोहलीच्या दबावात येऊन कुंबळेला हटविण्यात आले ते योग्य उदाहरण नव्हते. परंतू, आता या परिस्थितींमध्ये कुंबळे किंवा लक्ष्मण टीम इंडियाच्या कोच पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत की नाही हे देखील या गोष्टींवर अवलंबून आहे, असे या अधिकाऱ्याने म्हटले.
मुख्य कोच रवी शास्त्री आगामी टी20 विश्व कपनंतर आपले पद सोडण्याची शक्यता आहे. बीसीसीआय किंवा शास्त्रींकडून यावर खुलासा आलेला नाही. बीसीसीआय डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा असल्याने शास्त्रींचा एक महिन्याचा कार्यकाळ वाढविणार होते, मात्र शास्त्रींनीच त्यास नकार दिल्याचे समजते आहे.
बीसीसीआय नाराजरवी शास्त्रींच्या कार्यकाळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दोन टेस्ट सीरीज जिंकल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र, आयसीसी टुर्नामेंट न जिंकता आल्याने बीसीसीआय नाराज आहे.