Sanjiv Goenka profile: कोण आहेत Gautam Adani यांना मागे टाकत IPL च्या लखनौ टीमचे मालक बनलेले संजीव गोएंका?

कोलकात्याचे दिग्गज उद्योजक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांनी IPL मध्ये लखनौची फ्रेन्चायझी ७०९० कोटी रूपयांना खरेदी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:32 AM2021-10-27T11:32:34+5:302021-10-27T11:33:11+5:30

whatsapp join usJoin us
who is sanjiv goenka the man who defeated gautam adani in the race of ipl lucknow team | Sanjiv Goenka profile: कोण आहेत Gautam Adani यांना मागे टाकत IPL च्या लखनौ टीमचे मालक बनलेले संजीव गोएंका?

Sanjiv Goenka profile: कोण आहेत Gautam Adani यांना मागे टाकत IPL च्या लखनौ टीमचे मालक बनलेले संजीव गोएंका?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसंजीव गोएंका यांनी IPL मध्ये लखनौची फ्रेन्चायझी ७०९० कोटी रूपयांना खरेदी केली आहे.

2 New IPL Teams in 2022 Including Name, Owner, Price : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. BCCI या दोन संघांसाठी निविदा मागवल्या होत्या. All Cargo Logistics, Adani Group, RP Sanjiv Goenka आणि Uday Kotak या चार कंपनींमध्ये दोन नव्या फ्रँचायझींसाठी चुरस पाहायला मिळाली होती. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींची बोली लावली ( RPSG highest bid at INR 7000 CR.) संजीव गोएंका यांच्याकडे पुणे रायजिंग सुपरजायट्सं फ्रँचायझीचे मालकी हक्क होते आणि दोन वर्ष त्यांचा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. आता पुन्हा आयपीएलमध्ये त्यांनी एन्ट्री घेतली आहे.

लखनौचा संघ विकत घेण्याच्या स्पर्धेत देश  आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाचाही यांचाही सहभाग होता. अदानी समूहाने यासाठी ५,१०० कोटी रुपयांची बोली लावली होती. पण यामध्ये गोएंका यांनी बाजी मारली. २००८ मध्ये, मुकेश अंबानी यांनी ११.१९ कोटी डॉलर्सला मुंबई इंडियन्सचा संघ विकत घेतला होता. तब्बल १३ वर्षांनंतर लखनौला त्याच्यापेक्षा ९ पट अधिक पैसे देऊन संघासाठी खरेदी करण्यात आलं आहे.

कोण आहेत संजीव गोएंका?
संजीव गोएंका हे देशातील मोठ्या उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांचा आरपी संजीव गोएंका समूह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय करत आहे.पॉवर, कार्बन ब्लॅक, आयटीईएस, कंझ्युमर अँड रिटेल, मीडिया अँड एन्टरटेन्मेंट, स्पोर्ट्स, एज्युकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि नॅचरल रिसोर्सेसमध्ये त्यांचा समूह कार्यरत आहे. या समूहात ५० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. संजीव गोएंका हे RP संजीव गोएंका समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नेटवर्थ ४.३ अब्ज डॉलर्स आहे. २००१ मध्ये ते CII चे अध्यक्ष होते. ते आयआयटी खडगपूर मध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नर म्हणूनही कार्यरत होते. याशिवाय चे पंतप्रधान व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्यही होते.

काय आहे प्लॅन?
नीता अंबानी, जिंदल कुटुंबीय आणि अन्य संघाच्या मालकांसोबत यात सामील होणं ही सन्मानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला चांगली टीम तयार करण्याच्या आणि उत्तम खेळ खेळण्याच्या दिशेने काम करायचं आहे. उत्तर प्रदेशात आपल्या समुहासाठी मोठा बाजार आहे. त्याठिकाणी कंपनी पॉवर डिस्ट्रिब्यूशनमध्ये कार्यरत आहे.  Spencer’s Retail साठी हा पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशनंतर ती मोठी बाजारपेठही आहे. उत्तर प्रदेशच्या टीमचा मालकी हक्क मिळाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणच्या ग्राहकांशी जोडलं जाण्यास मदत मिळेल असंही गाएंका म्हणाले.

Web Title: who is sanjiv goenka the man who defeated gautam adani in the race of ipl lucknow team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.