लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन तुल्यबळ संघांत आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज लढत होत आहे. अव्वल धावगतीच्या आधारे हैदराबादचा संघ किंचित पुढे आला असला तरी चेन्नईनेदेखील मैदानावर धावांचा तितकाच पाऊस पडला आहे. शेवटच्या लढतीत ख-या अर्थाने ‘रन’संग्राम गाजविणारे संघ समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे विजेतेपदाचा ताज नक्की कोणाच्या शिरावर जातो, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नईची फलंदाजी व सनरायझर्सची गोलंदाजी यांच्यादरम्यान ही लढत होईल. तिसºयांदा जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असलेला चेन्नई संघ २०१६ चा चॅम्पियन सनरायझर्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीच्या पाच दिवसांनंतर खेळणार आहे. चेन्नई संघ ९ प्रयत्नांपैकी सातव्यांदा अंतिम फेरीत खेळत आहे. यंदा त्यांनी साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांत सनरायझर्सचा पराभव केला आहे. सनरायझर्सला दुसºया क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांचे गृहमैदान ईडनगार्डन्सवर लढत द्यावी लागली. त्यात त्यांनी १३ धावांनी विजय मिळवला.चेन्नईला दोन सामन्यांदरम्यान चार दिवसांची विश्रांती मिळाली, तर सनरायझर्सला थकवा विसरून खेळावे लागणार आहे. सनरायझर्सची सात दिवसांतील ही तिसरी लढत आहे.अफगाण क्रिकेटचा ‘वंडरबॉय’ राशिद खानने पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईला अडचणीत आणताना ११ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले होते. त्याने शुक्रवारी केकेआरविरुद्ध १० चेंडूंमध्ये ३४ धावा फटकाविल्या आणि ३ बळीही घेतले. याव्यतिरिक्त त्याने दोन झेल टिपले व एका फलंदाजाला धावबादही केले. चेन्नईला पहिल्या क्वालिफायरमध्ये फाफ डू प्लेसिसने नाबाद ६७ धावांची खेळी करीत एकट्याच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला होता. सॅम बिलिंग्ज दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्याने लाभ घेतला. चेन्नईला सनरायझर्सचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटवर अंकुश ठेवावा लागेल. त्याने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि चेन्नईविरुद्ध नाबाद ४३ धावा फटकावल्या होत्या. दुसºया बाजूचा विचार करता सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमन्सला कामगिरीत सातत्य राखण्याची आशा असेल. शिखर धवनवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. चेन्नई संघात शेन वॉटसन, सुरेश रैना व अंबाती रायुडू यांच्यासारखे फॉर्मात असलेले फलंदाज आहेत, तर कर्णधार धोनीने फिनिशरची भूमिका बजावली आहे. डू प्लेसिसचे खेळणे निश्चित आहे, तर रवींद्र जडेजा तळाच्या स्थानी उपयुक्त फलंदाज आहे.उभय संघांदरम्यान २२ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना झाला होता. त्यात २०१० व २०११ चा चॅम्पियन संघ चेन्नईने २ गडी राखून सरशी साधत अंतिम फेरी गाठली होती.चेन्नई सुपर किंग्जअंतिम फेरीपर्यंत प्रवाससनरायझर्स हैदराबादचा २ विकेटने पराभव. (क्वालिफायर १)किंग्ज इलेव्हन पंजाबचा ५ विकेटने पराभव.दिल्ली डेअर डेव्हल्सकडून ३४ धावांनी पराभव.सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटने पराभव.राजस्थान रॉयल्सकडून ४ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा ६ विकेटने पराभव.कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ विकेटने पराभव.दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १३ धावांनी पराभव.मुंबई इंडियन्सकडून ८ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ५ विकेटने पराभव.सनरायर्झस हैदराबाद संघाचा ४ धावांनी पराभव.राजस्थान रॉयलचा ६४ धावांनी पराभव.किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ४ धावांनी पराभव.कोलकाता नाईट रायडर्सचा ५ विकेटने पराभव.मुंबई इंडियन्सचा १ विकेटने पराभव.इंडियन्सचा १ विकेटने पराभव.फलंदाज :अंबाती रायडू (१५ डावांत ५८६ धावा; सर्वाधिक नाबाद १००)महेंद्रसिंह धोनी (१५ डावांत ४५५ धावा; सर्वाधिक नाबाद ७९)शेन वॉटसन (१४ डावांत ४३८ धावा; सर्वाधिक १०६)सुरेश रैना (१४ डावांत ४१३ धावा; सर्वाधिक नाबाद ७५)फाफ डु प्लेसिस (५ डावांत १५२ धावा; सर्वाधिक नाबाद ६७)ड्वेन ब्राव्हो (१० डावांत १४१ धावा; सर्वाधिक ६८)सॅम बिलिंग (८ डावांत १०८ धावा; सर्वाधिक ५६)रवींद्र जडेजा (१० डावांत ८९ धावा; सर्वाधिक नाबाद २७)गोलंदाज :शार्दूल ठाकूर ( १२ डावांत १५ विकेट)ड्वेन ब्राव्हो (१५ डावांत १३ विकेट)लुंगी एनगिडी (६ डावांत १० विकेट)दीपक चहर (११ डावांत १० विकेट)रवींद्र जडेजा (१५ डावांत १० विकेट)हरभजन सिंग (१३ डावांत ७ विकेट)इम्रान ताहिर (६ डावांत ६ विकेट)एकूण आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी2008 : उपविजेतेपद 2010 : विजेतेपद 2011 : विजेतेपद 2012 : उपविजेतेपद 2013 : उपविजेतेपद 2015 : उपविजेतेपदसनरायझर्स हैदराबादअंतिम फेरीपर्यंत प्रवासकोलकाता नाईट रायडर्स १४ धावांनी पराभूत (क्वालि. २)चेन्नई सुपर किंग्जकडून २ विकेटने पराभव. (क्वालि.१)कोलकाता नाईट रायडर्सकडून ५ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून १४ धावांनी पराभव.चेन्नई सुपर किंग्जकडून ८ विकेटने पराभव.दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ९ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ५ धावांनी पराभव.दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ७ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ११ धावांनी पराभव.किंग्ज इलेव्हन पंजाबचा १३ धावांनी पराभव.मुंबई इंडियन्सचा ३१ विकेटने पराभव.चेन्नई सुपर किंग्जकडून ४ धावांनी पराभव.किंग्ज इलेव्हन पंजाबकडून १५ धावांनी पराभव.कोलकाता नाईट रायडर्सचा ५ विकेटने पराभव.मुंबई इंडियन्सचा १ विकेटने पराभव.रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ९ विकेटने पराभव.फलंदाज :केन विल्यमसन (१६ डावांत ६८८ धावा; सर्वाधिक ५४)शिखर धवन (१५ डावांत ४७१ धावा; सर्वाधिक नाबाद ९२)युसूफ पठाण (११ डावांत २१५ धावा; सर्वाधिक नाबाद ४५)मनीष पांडे (१३ डावांत २८४ धावा; सर्वाधिक नाबाद ६२)अॅलेक्स हेल्स (६ डावांत १४८ धावा; सर्वाधिक ४५)शाकिब अल हसन (१२ डावांत २१६ धावा; सर्वाधिक ३५)वृद्धिमान साह (१० डावांत १२२ धावा; सर्वाधिक २४)कार्लोस ब्रेथवेट (३ डावांत ५४ धावा; सर्वाधिक नाबाद ४३)गोलंदाज :रशीद खान ( १६ डावांत २१ विकेट)संदीप शर्मा (११ डावांत ११ विकेट)सिद्धार्थ कौल (१६ डावांत २१ विकेट)शाकीब अल हसन (१६ डावांत १४ विकेट)भुवनेश्वर कुमार (११ डावांत ९ विकेट)बिली स्टॅनलेक (४ डावांत ५ विकेट)बसील थंपी (४ डावांत ५ विकेट)एकूण आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी२०१६ : विजेतेपद
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने
आयपीएलचा महाराजा ठरणार आज, चेन्नई-हैदराबाद आमने-सामने
मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन तुल्यबळ संघांत आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज लढत होत आहे. अव्वल धावगतीच्या आधारे हैदराबादचा संघ किंचित पुढे आला असला तरी चेन्नईनेदेखील मैदानावर धावांचा तितकाच पाऊस पडला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:06 AM