टीम इंडिया सध्या टी-२० फॉरमॅटसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. याची सुरुवात झिम्बाब्वे दौऱ्यापासूनच झाली आहे. या दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यामुळे युवा फलंदाज शुभमन गिलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आता प्रश्न असा पडतो की, शुभमन गिल हा कर्णधार म्हणून वरिष्ठ खेळाडूंचा केवळ पर्याय होता की बीसीसीआयच्या मनात त्याच्यासंदर्भात काही वेगळेच सुरू आहे? काहीही असले तरी, टीम इंडियाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एवढेच नाही तर, पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या शुभमन गिलने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
कोण होणार भारताचा कायमस्वरुपी टी-२० रकर्णधार? -
नुकत्याच झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी स्टार युवा फलंदाज शुभमन गिलला कर्णधार करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांपासून धावांसाठी संघर्ष करत असलेल्या शुभमनसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही एक मोठी संधी होती आणि त्याने तसे केलेही. खरे तर मालिकेच्या सुरुवातील भारताची सुरुवात फारच खराब झाली. यामुळे मॅनेजमेंटच्या निर्णयावर प्रश्नही उपस्थित केले गेले. मात्र मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले आणि संपूर्ण मालिकेतच भारताची सुरुवात जबरदस्त राहिली.
शुभमन गिलही चालला -
५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने झिम्बाब्वेचा ४-१ ने पराभव केला. या मालिकेत शुभमन गिलनेही चांगला खेळ केला. याच बरोबर त्याची एन्ट्री आता दिग्गजांच्या एका विशेष यादीतही झाली आहे. खरे तर, शुभमन गिलने ५ सामन्यात १७० धावा केल्या. यासह त्याचे नाव आता विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत एका खास यादीत आले आहे.
शुभमन गिलनं हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढवलं -
पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यानंतर शुभमन म्हणाला, "मला कर्णधार म्हणून नेतृत्व करताना मजा येते. यामुळे माझ्यातील जे सर्वश्रेष्ठ आहे ते समोर येते. मी प्रत्येकवेळी खेळात राहतो. यातून माझ्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजूही समोर येते, ज्याचा मी मैदानावर संपूर्ण आनंद घेतो." शुभमन गिल कर्णधार म्हणून एका टी२० मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. या यादीत २३१ रनासह विराट कोहली टॉपवर आहे.
हार्दिक पांड्या आणि सुभमन यांच्यात टक्कर -
रोहित शर्माच्या टी-२० इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आता हार्दिक पांड्याला टी-२० चा नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते. ऋषभ पंतही कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये आहे. यातच आता, झिम्बाब्वे दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापन गिलच्या नावाचाही विचार करू शकते. शुबमन गिल सध्या आयपीएलमध्येही नेतृत्व करत आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
Web Title: Who will be the T20 captain of Team India shubman gill rishabh pant and hardik pandya in race
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.