Join us  

यंदाची आयपीएल कोण गाजवणार?; या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष

काही स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. अशाच काही खेळाडूंचा घेतलेला आढावा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 6:20 AM

Open in App

- अयाझ मेमन

मुंबई : शुक्रवारी रंगणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्याने आयपीएलच्या १६व्या सत्राचे बिगुल वाजेल. यंदाचा विजेता कोण ठरणार, कोण ऑरेंज कॅप-पर्पल कॅप पटकावणार, यासारखे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे. काही स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. अशाच काही खेळाडूंचा घेतलेला आढावा. 

जोफ्रा आर्चर (मुंबई इंडियन्स) यंदा बुमराहच्या अनुपस्थितीत मुख्य गोलंदाजाची भूमिका.  चाहत्यांसह फ्रेंचाइजीकडून मोठ्या अपेक्षांचे ओझे. 

फाफ डूप्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)हेझलवूड, मॅक्सवेल सुरुवातीला नसल्याने कर्णधार म्हणून कसोटी लागणार. संघाला अद्याप जेतेपद पटकावता न आल्याने कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची संधी आहे.

डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स) कर्णधारपद भूषविताना लौकिकानुसार खेळण्याचे आव्हान.  आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यास ऑस्ट्रेलियन संघातील निवड धोक्यात.

हॅरी ब्रूक (सनरायझर्स हैदराबाद)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात अल्पावधीत आपला दणका दिला. हैदराबाद संघाकडून स्वत:ला स्टार क्रिकेटपटू म्हणून घडविण्याची ब्रूककडे मोठी संधी.

लोकेश राहुल (लखनऊ सुपर जायंट्स) सातत्याने फलंदाज म्हणून चमकतो; पण जेतेपद मिळवण्यात अपयशी.

हार्दिक पांड्या (गुजरात टायटन्स) जेतेपद कायम राखण्याचे आव्हान. तंदुरुस्ती कायम राखणेही महत्त्वाचे ठरेल. 

संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)गुणवान युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचे नेतृत्व. यशस्वी ठरल्यास भारतीय संघात ऋषभ पंतचा पर्याय म्हणून जागा मिळवू शकतो.

बेन स्टोक्स (चेन्नई सुपरकिंग्ज) यंदा मोठी किंमत मिळाल्याने मोठ्या अपेक्षा. धोनीनंतरचा भावी कर्णधार व मॅचविनर म्हणून ओळख निर्माण करावी लागेल. 

रवींद्र जडेजा  (चेन्नई सुपरकिंग्ज) मागच्या सत्रात नाराजीमुळे संघासोबत संबंध बिघडले होते. संघाचे कर्णधारपद मिळाले नसल्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खेळेल. अष्टपैलू म्हणून जबरदस्त फॉर्ममध्ये.

उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद) आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने त्याच्या गोलंदाजीवर लक्ष राहील. सातत्याने दीडशेच्या आसपास वेगाने मारा करण्याची क्षमता.

 

टॅग्स :आयपीएल २०२३बेन स्टोक्सडेव्हिड वॉर्नर
Open in App