अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आवेश खानने विजयाचा आनंद साजरा करताना उत्साहाच्या भरात हॅल्मेट फेकून दिले. याप्रकरणी मॅच रेफरीने त्याला फटकारले आहे. आवेशने देखील आयपीएल आचारसंहितेचा लेव्हल-१ गुन्हा २.२ मान्य केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल-१ भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो.
आवेशने सदर कृत्यावर आपले मत मांडले आहे. लखनऊ सुपरजायंट्सच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आवेश म्हणाला की, मी त्यावेळी काहीही विचार केला नाही, मला जे वाटले ते केले. यावर तोडलेल्या हॅल्मेटचे पैसे कोण देणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर 'मी देणार नाही, मॅनेजमेंट देईल, असं आवेश खान म्हणाला.
'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया
अखेरच्या चेंडूवर लखनऊचा विजय
१० एप्रिलला झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखऊने ९ गडी गमावून २१३ धावा करून विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर एक धाव काढून आवेश खानने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौने ६ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. तर लखनऊकडून मार्क स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी स्फोटक खेळी करून आरसीबीचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. स्टॉयनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावांची मोठी खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"