नागपूर : चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर आॅस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्याची संधी गमावलेला भारतीय संघ, रविवारी नागपूरमध्ये विजयाच्या निर्धारानेच उतरेल. फलंदाजीत मोक्याच्या वेळी झालेल्या चुकांचा फटका भारतीयांना तिस-या सामन्यात बसला. दुसरीकडे, चौथा सामना जिंकून चांगली लय मिळविलेला आॅसी संघ अखेरचा सामना जिंकून, एकदिवसीय मालिकेची विजयी सांगता करण्यास उत्सुक असेल.सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या भारताने चौथ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी दिली. मात्र, यजमानांना २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, यामुळे संघाची सलग ९ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. त्यामुळे टी२० मालिकेआधी पुन्हा एकदा विजयी लय मिळविण्यासाठी, अखेरचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया त्वेषाने खेळणार हे नक्की. त्याच वेळी, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय कायम ठेवला, तर या सामन्यात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना आणखी विश्रांती मिळेल, तसेच घरच्या मैदानावर सामना होत असल्याने, ‘लोकल बॉय’ उमेश यादव याचा संघातील समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. फलंदाजीमध्ये लोकेश राहुलला संधी मिळू शकते. कारण तोच एकमेव फलंदाज राहिला आहे, ज्याला या मालिकेत अद्याप एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.दुसरीकडे, रांची येथे सुरू होणाºया टी२० मालिकेकडे पाहता, भारताच्या संघ व्यवस्थापनाला पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी आपल्या रणनीतीविषयी पुनर्विचार करावा लागेल. कारण दोन्ही संघ टी२० मालिकेआधी विजय मिळविण्यास उत्सुक आहेत.रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी भारताला गेल्या दोन सामन्यांत भक्कम सुरुवात करून दिली. मात्र, मधल्या फळीला याचा फायदा घेता आला नाही. फलंदाजीचा विचार करताना, भारतासाठी अद्याप मनिष पांड्ये आणि कर्णधार कोहली विशेष छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे या दोघांकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. जर राहुलला खेळविण्याचा निर्णय घेतला, तर मनिषला बाकावर बसावे लागेल.गोलंदाजीमध्ये सर्वांच्या नजरा लोकल बॉय उमेश यादववर असतील. त्याच्या जोडीला मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल व अक्षर पटेल असतील. शिवाय बदली गोलंदाज केदार जाधव व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यावरही विशेष जबाबदारी असेल.दुसºया बाजूला पाहुण्या आॅस्टेÑलियाचा विजयी सांगता करण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. डेव्हीड वॉर्नर-अॅरोन फिंच यांच्याकडून पुन्हा एकदा आॅसीला धमाकेदार सुरुवातीची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे, दोन्ही फलंदाज पूर्णपणे लयीमध्ये असल्याने, भारतीय गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल.‘लोकल बॉय’ उमेशवर लक्ष केंद्रीत- नागपूरकरांची नजर स्थानिक खेळाडू उमेश यादववर केंद्रित झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडणाºया उमेशला, अद्याप नागपुरातील आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. या वेळी उमेशला संधी मिळण्याची शक्यता आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात उमेशचा भारतीय संघात समावेश झाला होता, पण त्या वेळी त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नव्हते. नागपूरने प्रशांत वैद्य, फैज फझल व उमेश यादव हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलेले आहे.वेगवान माºयाने प्रतिस्पर्धींवर वर्चस्व गाजविणाºया उमेशला घरच्या मैदानावर खेळताना बघण्यास नागपूरकर उत्सुक आहेत. त्यामुळेच उमेशला घरच्या मैदानावर खेळताना बघण्याचे नागपूरकरांचे स्वप्न खरे होईल, अशी आशा आहे.तिकिटांसाठी भटकंती...भारताने ही मालिका ३-१ ने आधीच जिंकली असली, तरी पाचव्या आणि अखेरच्या सामन्याला हजेरी लावण्यास इच्छुकांनी तिकिटांसाठी भटकंती चालविली आहे. सामन्याची २७ हजार ४०० तिकिटे विक्रीसाठी होती.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आॅनलाइन तिकिटे अवघ्या १५ मिनिटांत बुक होताच, चाहत्यांची घोर निराशा झाली. ज्यांना प्रत्येकी चार तिकिटे मिळाली, ते चढ्या दराने तिकिटे विकत असल्याची क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा आहे.
यातून निवडणार संघआॅस्टेÑलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, ट्राविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, अॅश्टन एगर, केन रिचडर््सन, पॅट कमिन्स, नॅथन कुल्टर - नाइल, अॅरोन फिंच, पीटर हँड्सकॉम्ब, जेम्स फॉल्कनर आणि अॅडम झम्पा.भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनिष पांड्ये, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि लोकेश राहुल.सामना : दुपारी १.३० पासून स्थळ : जामठा स्टेडियम, नागपूर