Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

Ashish Nehra : रिषभच्या फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर आशिष नेहरा ( Ashish Nehra) ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे

By स्वदेश घाणेकर | Published: March 6, 2021 10:16 AM2021-03-06T10:16:31+5:302021-03-06T10:17:12+5:30

whatsapp join usJoin us
Whoever takes blessings from Ashish Nehra, becomes a legend, Rishabh Pant & Virat Kohli old photo goes viral | Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ashish Nehra : भारत-इंग्लंड ( India vs England 4th Test) यांच्यातल्या चौथ्या कसोटीत रिषभ पंतनं ( Rishab Pant) इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.  ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ बाद झाल्यानंतर वॉशिंग्टननं खिंड लढवताना अर्धशतक पूर्ण केलं आणि तिसऱ्या दिवशी तो शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रिषभच्या फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर आशिष नेहरा ( Ashish Nehra) ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यात आशिष नेहराचा ऑटोग्राफ घेताना दोन लहान मुलं दिसत आहेत. आज ती दोन्ही मुलं टीम इंडियाचे यशस्वी खेळाडू आहेत. त्यामुळे नेहराचा ऑटोग्राफ घ्या अन् स्टार खेळाडू बना, अशी चर्चा सुरू झाली आहे. रिषभ पंतविराट कोहली यांचे हे फोटो आहेत आणि त्यांनी नेहराचा ऑटोग्राफ घेतला होता.  IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्... 

रिषभ पंतनं केले विक्रम
 - इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा सहावा यष्टिरक्षक ठरला रिषभ पंत
- आतापर्यंत आशियातील दोन यष्टिरक्षकांना इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक झळकावता आले
- वृद्धीमान सहाच्या तीन कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी, परंतु महेंद्रसिंग धोनी ( 6)  पेक्षा मागे 

रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल - सौरव गांगुली
येत्या काळात रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल. रिषभ किती जबरदस्त खेळाडू आहे. दबावाच्या परिस्थितीत खेळलेली रिषभची शतकी खेळी अविश्वसनीय आहे. त्यानं हे काही पहिल्यांदा केलेलं नाही आणि शेवटचं देखील नाही. येत्या काळात रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान खेळाडू होईल. असाच आक्रमक पद्धतीनं फलंदाजी करत राहा. तो असाच मॅच विनर आणि विशेष खेळाडू म्हणून ओळखला जाईल. असे सौरव गांगुलीनं ट्विट केलं. वीरेंद्र सेहवागची आतषबाजी, 15 चेंडूंत 70 धावा; सचिन तेंडुलकरसह 10.1 षटकांत जिंकला सामना

सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे...?







Web Title: Whoever takes blessings from Ashish Nehra, becomes a legend, Rishabh Pant & Virat Kohli old photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.