IPL 2024, RR vs DC Who's Gujarat's Saurav Chauhan? इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आज एका साधारण कुटुंबातील मुलाने पदार्पण केले. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने जेव्हा या खेळाडूची ओळख करून दिली, तेव्हा तो म्हणाला, सौरव चौहान हे नाव अनेकांच्या परिचयाचे नाही. पण, या खेळाडूत प्रचंड कौशल्य आहे. सौरव चौहानने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० ट्रॉफी २०२३ मध्ये वादळी अर्धशतक झळकावले होते आणि तेव्हा त्याच्या नावाची चर्चा झाली. रांची येथील अरुणाचल प्रदेश आणि गुजरात यांच्यातील गट क चकमकीमध्ये सौरवने गुजरातकडून खेळताना १३ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे सर्वात वेगवान ट्वेंटी-२० अर्धशतक ठरले.
सौरवने २०२१ मध्ये केरळविरुद्ध गुजरात संघाकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी, तो लिस्ट ए फॉरमॅटमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. आतापर्यंत त्याने ५० षटकांचे ७ सामने आणि १२ ट्वेंटी-२० खेळले आहेत. त्याने अनुक्रमे २९२ व २७४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर लिस्ट ए फॉरमॅटमध्ये एक शतक आणि ट्वेंटी-२०त ३ अर्धशतके आहेत. गेल्या मोसमात, त्याने केरळविरुद्ध आपल्या गुजरातसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ६ सामन्यांमध्ये २५ च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह २२५ धावा केल्या.
सौरवचे वडील अहमदाबादमधील नवरंगपुरा येथील एएमसी स्टेडियममध्ये ग्राउंड्समन होते. सौरव आपल्या कुटुंबासह स्टेडियमच्या खांबाला लागून बांधलेल्या एका खोलीच्या घरात राहिला आहे. RCB ने २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला करारबद्ध केले.