रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरच्या टीम डेव्हिडला ( Tim David) आपल्या संघात दाखल करून घेतले. डेव्हिड हा मुळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयसीसीनं १०६ सदस्य देशांना ट्वेंटी-२०तील आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. ६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह झाले लठ्ठ, Photo Viral
बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत त्यानं सरे क्लबचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमधील दोन शतकं झळकावली. त्यानं तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.