श्रेयस-इशान यांना एक न्याय, हार्दिकला दुसरा? BCCI ने पांड्याला करारबद्ध का केले?

बीसीसीआयने काल संध्याकाळी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 01:32 PM2024-02-29T13:32:09+5:302024-02-29T13:32:30+5:30

whatsapp join usJoin us
Why BCCI retained Hardik Pandya in its central contracts list? | श्रेयस-इशान यांना एक न्याय, हार्दिकला दुसरा? BCCI ने पांड्याला करारबद्ध का केले?

श्रेयस-इशान यांना एक न्याय, हार्दिकला दुसरा? BCCI ने पांड्याला करारबद्ध का केले?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI Central Contract ( Marathi News ) - बीसीसीआयने काल संध्याकाळी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेट, विशेषतः रणजी करंडक स्पर्धेपेक्षा आयपीएलला प्राधान्य देऊ नका, असे बीसीसीआय वारंवार इशारा दिते होती. पण, इशान आणि अय्यर दोघांनीही हा इशारा गंभीरपणे घेतला नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला. मात्र, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्यासाठी वेगळा न्याय बीसीसीआयकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


वन डे वर्ल्ड कप २०२३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर किशनने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही, तर अय्यर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर NCA मध्ये गेला. पण, तिथून तंदुरुस्त होऊनही तो रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळला नाही. अय्यरने असा दावा केला की पाठीच्या दुखण्यामुळे मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बीसीसीआयने या दोघांना शिक्षा दिली. मग हार्दिक पांड्याला हीच वागणूक का मिळाली नाही? 


हार्दिकही दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता, एनसीएमध्ये पुनर्वसन केल्यानंतर आणि पुन्हा तंदुरुस्ती प्राप्त केल्यानंतर तो डीवाय पाटील स्पर्धा खेळण्यासाठी आला. हार्दिकने बीसीसीआयला कळवले होते की त्याचे शरीर कसोटी क्रिकेटमधील कठोरता हाताळू शकत नाही. हार्दिकने २०१८ मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. बडोदा विरुद्ध मुंबई विरुद्ध रणजी करंडक गटाच्या सामन्यानंतर तो रेड बॉल क्रिकेटपासून दूर राहिला आहे. हार्दिक हा भारताच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचा नियमित सदस्य आहे आणि बीसीसीआयच्या परवानगीने तो त्याच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. 

इरफान पठाणचा थेट सवाल

''श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. आशा आहे की ते मजबूत पुनरागमन करतील. हार्दिक सारख्या खेळाडूंना लाल चेंडूचे ( पाच दिवसांचे) क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या ( मर्यादित षटकांच्या) देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही!,''असे इरफानने ट्विट केले.  

Web Title: Why BCCI retained Hardik Pandya in its central contracts list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.