मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष राहुल द्रविडला बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एक नोटीस पाठवल होती. द्रविड हा परस्पर हितसंबंधांमध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे तो भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करू शकत नाही, असा या नोटीशीचा मतितार्थ होता. पण द्रविडने असे नेमके केले आहे तरी काय, जाणून घेऊया...
एक खेळाडू म्हणून द्रविड हा जंटलमन होता. प्रशिक्षक म्हणूनही द्रविडने आपली छाप पाडली आहे. पण आता द्रविड परस्पर हितसंबंधांमध्ये गुंतल्याचे बीसीसीआयला वाटत आहे. कारण एक संघटक आणि उद्योगपती यांच्याबरोबर द्रविडचे संबंध बीसीसीआयनेच उघड केले आहेत.
द्रविड हा निवृत्तीनंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघाबरोबर काम करत होता. राजस्थानच्या संघाचा तो प्रशिक्षक होता. चेन्नई सुपर किंग्सचा संघ त्यांचा प्रतिस्पर्धी होती. पण तरीही या प्रतिस्पर्धी संघाच्या मालकाबरोबर द्रविडचे घनिष्ठ संबंध होते. कारण चेन्नईच्या संघाचे मालक एन. श्रीनिवासन आहेत. एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स या कंपनीचे मालक आहे. आपल्या कंपनीमध्ये एन. श्रीनिवासन यांनी द्रविडला उपाध्यक्ष हे महत्वाचे पद दिले आहे. त्यामुळे बीसीसीआयने द्रविडला परस्पर हितसंबंध जपल्याची नटीस पाठवली आहे.
कसे हितसंबंध जपले जाणार, बीसीसीआयला काय वाटतेएन. श्रीनिवासन यांच्या कंपनीमध्ये द्रविड उपाध्यक्ष पदावर आहे. त्याचबरोबर तो सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंनाही तो मार्गदर्शन करत असतो. यावेळी जर चेन्नईच्या संघातील खेळाडू यामध्ये असेल तर द्रविड त्याला झुकते माप देऊ शकतो, असे बीसीसीआयला वाटते आणि हेच परस्पर हितसंबंध जपले जाऊ शकतील. त्यामुळे बीसीसीआयने द्रविडला नोटीस पाठवून याबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
थोड्याच वेळात होणार राहुल द्रविडच्या भवितव्याबाबत निर्णय, सुनावणी संपलीमुंबई : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या भवितव्याचा निर्णय थोड्याच वेळात अपेक्षित आहे. कारण द्रविडवरील आरोपांची सुनावणी संपली आहे. त्यामुळे काहीच वेळात यावर निर्णय अपेक्षित आहे.
बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्यांनी द्रविडला नोटीस बजावली होती. या नोटीशीमध्ये द्रविड परस्पर हितसंबंध जपत असल्याचे म्हटले गेले होते. या नाटीशीवर द्रविडला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार द्रविडने आपली बाजू मांडली आहे. आता या प्रकरणावरील निर्णय लवकरच येऊ शकतो.
द्रविड हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. पण दुसरीकडे द्रविड चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स या कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे. त्यामुळे द्रविड परस्पर हितसंबंध जपत आहे, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.