Join us  

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा

भारतीय संघानं 2008मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 1:54 PM

Open in App

2008मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगनं ( आयपीएल) भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आयपीएलमधील प्रत्येक संघानं स्थानिक स्टार खेळाडूंना आपल्या चमूत दाखल केले. दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आता दिल्ली कॅपिट्ल)ने वीरेंद्र सेहवाग, कोलकाता नाईट रायडर्सनं सौरव गांगुली, मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर आदी खेळाडूंना आपल्या संघाचा चेहरा बनवला. त्याचवर्षी भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला. त्यामुळे 2008च्या ऑक्शनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विराटला करारबद्ध करतील, असा अंदाज होता. पण, दिल्लीनं विराटकडे दुर्लक्ष केलं. यामागचं कारण आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमण यांनी सांगितले. 

Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!

आज विराट हा भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. पण, 2008मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनं त्याला करारबद्ध करण्याची संधी सोडली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विराटला करारबद्ध केले. गौरव कपूर याच्याशी बोलताना रमण यांनी विराटला का घेतलं नाही, यामागचं कारण सांगितले. आयपीएल लिलावात दिल्लीनं प्रदीप सांगवानची निवड केली. 

रमण यांनी सांगितले की,''त्यावर्षी भारतीय संघानं 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. ऑक्शनच्या महिनाभरा पूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ही कमाल केली होती. पण, दिल्लीनं 19 वर्षांखालील खेळाडूंचा ड्राफ्ट वेगळा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्या ड्राफ्टनुसार विराट हा त्यांची पहिली पसंती नव्हती. दिल्लीनं त्याला संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यांनी प्रदीप सांगवानची निवड केली, कारण त्यांना अतिरिक्त फलंदाज नको हवा होता. तेव्हा दिल्लीकडे सेहवाग आणि एबी डिव्हिलियर्स ही मोठी नावं होतं. तेव्हा त्यांचा तो विचार योग्य होता, परंतु बंगळुरूनं त्याला घेतलं.''

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान

IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स