कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ५८३३ लोकांना मृत्यू झाला. त्यामुळे जगभरात जणू या विषाणूच्या दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ), भारत-दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आदी क्रिकेट मालिकांसह इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, सीरि ए इटालियन लीग आदी फुटबॉल स्पर्धाही रद्द करण्याचा किंवा बंद दरवाजात खेळवण्याच्या निर्णय घेतला गेला आहे. चीनच्या वुहान येथून हा विषाणू जगभरात पसरला. त्यामुळे आता पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच खवळला आहे. त्यानं चिनी लोकांना धारेवर धरले आहे.
''लोकं वटवाघूळ का खातात, त्यांचे रक्त आणि लघवी का पितात? त्यामुळे कोरोना विषाणू पसरला गेला आहे. मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांनी जगाला वेठीस धरले आहे. मला अजूनही कळत नाही, तुम्ही वटवाघूळ, कुत्री-मांजरं कशी खाऊ शकता,'' असा सवार अख्तरनं त्याच्या यू ट्यूब चॅनेलवरून विचारला आहे.
''संपूर्ण जग आता दहशतीच्या सावटासाली आहे. पर्यटन व्यावयसाय ठप्प झाला आहे आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरित परिणाम झाला आहे. मी चिनी लोकांविरोधात नाही, परंतु तेथील प्राण्यांविरोधी कारद्यावर नाराज आहे. ती त्यांची संस्कृती असू शकते, परंतु त्यामुळेच तुम्हाला मोठा फटका बसला आहे. लोकं मरत आहेत. चिनी लोकांवर बंदी घाला असे मी म्हणणार नाही, परंतु काही नियम बनायला हवेत. तुम्ही काहीही खाऊ शकत नाही,'' असे अख्तर म्हणाला.
चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू जगभरात पसरला आणि आतापर्यंत १०० देशांतील १ लाख ३० लोकांना त्याची लागण झाली आहे. पाकिस्तानात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या २८ पर्यंत गेली आहे.
पाहा व्हिडीओ
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही
Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?
Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली
Web Title: Why eat bats, drink their blood and urine? Shoaib Akhtar asks China as coronavirus kills thousands svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.