Why Indian Team Wear Blue Jersey? - क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळ असो किंवा बॅटमिंटन, टेनिस, स्क्वॉश आदी क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. हॉकी व फुटबॉलमध्ये होम-अवे या नियमांमुळे पांढऱ्या रंगाची जर्सी घातली जाते, परंतु त्यांच्या मुख्य जर्सीचा रंग हा निळाच राहिलेला आहे. जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय संघ केवळ निळ्याच रंगाची जर्सी घालून का मैदानावर उतरतो?, भारतीय संघाच्या जर्सीसाठी याच रंगाची निवड का करण्यात आली?, केशरी, हिरवा किंवा पांढरा हे तिरंग्यातील रंगांपैकी एकाची निवड का केली गेली नाही? हे प्रश्न आपल्याला कधी पडले असतील किंवा नसतील, पण आज आपण या सर्वांची उत्तरं जाणून घेणार आहोत.
सुरुवातीला क्रिकेट असो किंवा अन्य खेळ यांची जर्सी ही पांढऱ्या रंगाचीच होती. पण, टीव्ही चॅनेल्स सुरू झाले आणि ब्लॅकअँड व्हाईटचा जमाना जाऊन क्षणचित्र रंगीत स्वरूपात दिसू लागले. त्यानंतर खेळांमध्येही बदल होत गेले. केशरी रंग हा शौर्याचा प्रतीक आणि हिरवा रंग आनंदाचे प्रतीक, तर पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तिंरग्यातील कोणताही रंगाचा जर्सीसाठी विचार केला असता तर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला असता आणि त्यावरून राजकारण तापले असते. केशरी हा हिंदू, जैन व बौद्धांचा किंवा काही राजकीय पार्टींचा, हिरवा हा मुस्लिम समुदायाचा असा तेव्हा विचार केला गेला असावा. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याची प्रचिती देणारा रंगच जर्सीसाठी हवा होता.
निळा रंग हा आकाश, सागर आणि विशालतेचं प्रतिक आहे. म्हणूनच क्रीडा क्षेत्रात जर्सीसाठी याची निवड केली गेली असावी. अशोक चक्रातील गडद निळा रंग हा सर्वप्रथम निवडला गेला आणि भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचाही हाच प्रमुख रंग होता. १९८५ मध्ये क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आणि त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी होती. नंतर १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून रंगीत जर्सीची सुरुवात झाली. १९९६, १९९९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या जर्सीवर पिवळा रंग बऱ्यापैकी नक्षीदार होता. २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून भारतीय संघाच्या जर्सीवरून पिवळा रंग नाहीसा झाला. जर्सीवर केशरी रंग थोड्या फार प्रमाणात दिसतो. c