टेनिस सुपरस्टार मारिया शारापोव्हा ( Maria Sharapova) पून्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या फेसबूक पेजवर नेटिझन्सनी सॉरीचे मॅसेज पाठवले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) याच्यामुळे शारापोव्हाची नेटिझन्स माफी मागत आहेत.
२०१४मध्ये मारियानं सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे विधान केलं होतं. विम्बल्डनचा एक सामना पाहण्यासाठी सचिन आणि माजी महान फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम गेले होते. या सामन्यानंतर काही पत्रकारांनी शारापोव्हाला एक प्रश्न विचारला होता. आजचा सामना पाहायला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आला होता, तू त्याला ओळखतेस का? या प्रश्नावर शारापोव्हाने नाही असे उत्तर दिले होते आणि मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी तिला नको तितकं सुनावलं होतं आणि आता सात वर्षानंतर भारतीयांनी तिची माफी मागितली आहे. कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण
''आम्हाला माफ कर मारिया... खेळाडू म्हणून सचिनला आम्ही ओळखतो, परंतु व्यक्ती म्हणून ओळखू शकलो नाही. तू बरोबर होतीस आणि तुझ्यावर टीका केल्याबद्दल माफी मागतो.''
''ट्रक भरून माफी मागतो, बहीण. तुझी दूरदृष्टी आम्ही ओळखू शकलो नाही आणि आता ती खरी ठरत आहे.''