Lasith Malinga Mumbai Indians: IPL 2022 स्पर्धेला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे. गेल्या वर्षीचा विजेता आणि उपविजेता संघ (CSK vs KKR) यंदाचा सलामीच्या सामन्यात भिडणार आहेत. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली २७ तारखेला दिल्लीविरूद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. यंदाच्या मुंबई संघात जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी नवा जोडीदार शोधण्याचं आव्हान असेल. गेले दोन वर्षे ट्रेंट बोल्टशी त्याची चांगली गट्टी जमली होती. त्याआधी बरेच वर्ष यॉर्कर किंग लसिथ मलिंगासोबत त्याची जोडी होती. पण यावेळी मलिंगा आणि बोल्ट दोघेही राजस्थानच्या ताफ्यात असतील. मलिंगा इतके वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळूनही त्याला संघाने कोचिंग स्टाफमध्ये दाखल का करून घेतला नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं.
२००८मध्ये IPLच्या सुरुवातीपासूनच लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला. १३ वर्षे मुंबईसोबत तो खेळला, पण आता तो राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दाखल झालाय. मुंबईसाठी इतके वर्षे खेळणारा मलिंगा निवृत्तीनंतर मुंबईसोबत कोचिंग स्टाफमध्ये का नाही याचं उत्तर राजस्थान रॉयल्सचे Director of Cricket आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगाकारकडून मिळालं. मुंबई इंडियन्सचं संघ व्यवस्थापन मलिंगाला कोचिंगसाठी करारबद्ध करण्यासाठी अनुकूल होतं. त्यांना त्यात रूची होती. पण मुंबईच्या कोचिंग स्टाफमधील एकही जागा रिक्त नसल्याने त्यांना मलिंगाला करारबद्ध करता आलं नाही.
लसिथ मलिंगा राजस्थानशी जोडला गेल्याने मुंबईचा संघ नाराज आहे का? असाही सवाल संगाकाराला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, "मला तरी असं काही दिसलं नाही. याउलट मुंबई इंडियन्सचे कोच महेल जयवर्धने या या गोष्टीचा खूप आनंद झाला. मुंबईला त्याला करारबद्ध करण्याची इच्छा असूनही शक्य झालं नव्हतं त्यामुळे त्याला आमच्या माध्यमातून IPL शी परत जोडता आलं याचा जयवर्धनेलाही आनंद झाला."
Web Title: Why Mumbai Indians did not Sign Lasith Malinga for coaching staff for IPL 2022 Here is the real reason Rohit Sharma Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.