ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघामध्ये एकही मुस्लीम खेळाडू का नाही असा प्रश्न विचारणारे ट्विट केलेप्रत्येक खेळाडू जो भारतीय संघासाठी मैदानात उतरतो तो हिंदुस्तानी असतोहिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन व शीख हे भावांप्रमाणे असल्याचे हरभजनने म्हटले आहे.
नवी दिल्ली - भारतासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू हा हिंदुस्तानी असतो असे सांगत हिंदू - मुस्लीम असा वाद निर्माण करणाऱ्याला हरभजन सिंगने चपराक लगावली आहे. संजीव भट्ट या माजी आयपीएस अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघामध्ये एकही मुस्लीम खेळाडू का नाही असा प्रश्न विचारणारे ट्विट केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धोरणाला लक्ष्य करत भट्ट यांनी भारताच्या नुकत्याच निवडलेल्या संघात मुस्लीम खेळाडू का नाही असा सवाल विचारला होता. का मुस्लीम खेळाडुंनी क्रिकेट खेळणं बंद केलंय असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
या ट्विटला हरभजन सिंगनं आपल्या स्टाइलमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. प्रत्येक खेळाडू जो भारतीय संघासाठी मैदानात उतरतो तो हिंदुस्तानी असतो असं भज्जी म्हणाला आहे. कुणीही क्रिकेटच्या खेळामध्ये जात - धर्म आणू नये असा सल्ला देताना हरभजनने हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन व शीख हे भावांप्रमाणे असल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयने नुकताच न्यूजीलंड विरुद्ध खेळण्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोट सामन्यांसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हैदराबादच्या मोहम्मद सिराजची टी-20 संघामध्ये वर्णी लागली आहे आणि मोहम्मद शामीचं कसोटी संघातलं स्थान अबाधित ठेवण्यात आलं आहे.
मात्र, संजीव भट्ट यांनी असं ट्विट केलं असून त्याला भज्जीनं प्रत्युत्तर दिलं आहे.
Web Title: Why not a Muslim in the Indian team? - Harbhajan Singh gave befitting reply
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.