ठळक मुद्देदिनेश कार्तिक व रिषभ पंत यांच्यात अनुभवी कार्तिकचा नंबर लागलायष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला राखीव खेळाडू म्हणून कार्तिक वर्ल्ड कपला जाणाररिषभ पंतच्या नावाचीच होती चर्चा, पण...
मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे 15 शिलेदार सज्ज झाले आहेत. केदार जाधवच्या दुखापतीनं संघातील चिंता वाढवली असली तरी त्याला सावरण्यासाठी 2-3 आठवड्यांचा पुरेसा कालावधी आहे. पण, दुखापतीतून त्याला सावरता न आल्यास रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात रिषभ पंतने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये जोरदार फटकेबाजी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे त्याचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात संधी मिळायला हवी, असे अनेकांना वाटते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी तर थेट रिषभ पंत वर्ल्ड कप संघात का नाही, असा सवाल भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना केला.
(ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल)
आयपीएलच्या इलिमिनेटर लढतीत दिल्ली कॅपिटल्सने रिषभच्या आतषबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. रिषभने 21 चेंडूंत 49 धावांची खेळी केली. त्यात 2 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. या फटकेबाजीनंतर त्याच्या वर्ल्ड कप समावेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली. ''वर्ल्ड कप संघात रिषभ पंत का नाही? रवी शास्त्री आणि विराट कोहली तुम्ही माझा सवाल ऐकताय ना?,'' असा प्रश्न ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावरून केला आहे.
( India Squad For World Cup 2019: वन डे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी)
वर्ल्ड कपसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाची निवड होईल, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. अखेर अनुभवी दिनेशच्या नावाची घोषणा निवडकर्त्यांनी जाहीर केली.
दिनेश कार्तिकची निवड का झाली हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. रिषभ पंत हा संघात निवडल्या गेला असता मात्र दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला, असेही स्पष्ट करण्यात आले.
(बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर...)
भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
भारताचे सामने ( वेळ सायंकाळी 3 वाजता)
बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिका
रविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंड
रविवार 16 जून 2019 : पाकिस्तान
शनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिज
रविवार 30 जून 2019: इंग्लंड
मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश
शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका
Web Title: Why is Rishabh Pant not in World Cup squad? Rishi Kapoor asks Ravi Shastri, Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.