Join us  

ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर 

- इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 2:25 PM

Open in App

बर्मिंगहॅम - इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. या लढतीपूर्वी संघव्यवस्थापनाने भारतीय संघात केलेल्या काही बदलांवरही क्रिकेटप्रेमींकडून टीका होत आहे. दरम्यान,  338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्याऐवजी ऋषभ पंतला आधी फलंदाजीस का पाठवले अशी विचारणा केली असता रोहित शर्माने त्याला फार मजेशीर उत्तर दिले आहे. सामना संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या रोहित शर्मावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. दरम्यान, ऋषभ पंतला हार्दिक पांड्याच्या आधी फलंदाजीला पाठवल्याने धक्का बसला नाही का? अशी विचारणा रोहित शर्माकडे करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, खरं सांगायचं तर ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवल्याने मला आश्चर्य वाटले नाही. कारण ऋषभने वर्ल्डकमध्ये खेळावे, अशी तुम्हा सर्वांचीच इच्छा होती. जेव्हा आम्ही विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी निघालो होते, तेव्हा तुम्ही सर्वजण विचारत होता की ऋषभ पंत कुठे आहे म्हणून. आता तो चौथ्या क्रमांकावर खेळतोय. असे रोहित शर्माने सांगितले. अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाल्याने ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.  या लढतीत पंतने 29 चेंडूत 32 धावा फटकावल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. या दरम्यान, त्याने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या साथीने उपयुक्त भागीदाऱ्याही केल्या.  मात्र 40 व्या षटकात एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत बाद झाला. लियम प्लंकेटच्या गोलंदाजीवर चेंडू सीमारेषा पार धाडण्याच्या प्रयत्नात ख्रिस व्होक्सने सीमारेषेवर त्याचा झेल टिपला.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघरिषभ पंतरोहित शर्मा