भारतीय महिला संघाची उप कॅप्टन स्मृती मानधना हिच्यासाठी २०२४ हे वर्ष एकदम झक्कास राहिले. तिने टी-२० आणि वनडेत धमाकेदार कामगिरी करुन दाखवली. अनेक विक्रम सेट करत तिनं हे वर्ष गाजवलं. एका बाजूला तिच्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीची चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर स्टार महिलावर ICC कडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. क्रिकेट चाहते आयसीसीला ट्रोलही करू लागले आहेत. जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती
आयसीसी पुरस्कार अन् नामांकन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून काही दिवसांपूर्वीच यावर्षीच्या आयसीसी पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. महिला गटात 'क्रिकेटर ऑफ द इयर'च्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल जेन सदरलँड, दक्षिण आफ्रिकाची लॉरा वॉलवाट, न्यूझीलंडची अमेलिया केर आणि श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू या चौघींना नामांकन मिळले आहे. या यादीत भारताच्या स्टार बॅटरच नाव नसणं अनेकांना आश्चर्यचकित वाटते. ती या पुरस्काराच्या यादीत का नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. स्मृती मानधनाच्या वर्षभरातील कामगिरीचा दाखला देत नेटकरी थेट आयसीसीवर निशाणा साधताना दिसत आहेत. आयसीसीकडून तिच्यावर अन्याय झाल्याची भावनाही सोशल मीडियावर दाटून आलीये.
स्मृती मानधनाची कामगिरी
महिला क्रिकटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत स्मृती मानधना आघाडीवर आहे. वनडेसह टी-२० क्रिकेटमध्ये तिने सर्वाधिक धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यातील १३ डावात तिने ५७.४६ च्या सरासरीनं ७७४ धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. टी २० क्रिकेटमध्ये तिने ४२.३८ च्या सरासरीनं ७६३ धावा काढल्या आहेत. यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. एका वर्षात सर्वाधिक १६५९ धावा करूनही ती पुरस्काराच्या शर्यतीत का नाही? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडल्याचे दिसते.
Web Title: Why Smriti Mandhana Not Nominated For ICC Cricketer Of The Year Award Fans Upset Reaction On Social Media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.